बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राकडून जनजागृती उपक्रम


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Oct 2026, 1:22 PM
   

अकोला : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज, अकोला येथे अमरावती येथील बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने मानसिक आरोग्यविषयक जाणीव व जागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजच्या संस्थापक वसुधा गडेकर  तसेच या नर्सिंग कॉलेजच्या सेक्रेटरी  अॕड. वैशाली वाळचाळे यांनी विशेष सहकार्य केले.  प्राचार्य युवराज जी. टी. पाटील,  प्राध्यापक अभिजीत भोयर सर,तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य युवराज जी. टी. पाटील यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व विशद केले, तर प्रा. अभिजीत  भोयर यांनी मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मानसिक आरोग्य आणि पालकांच्या भूमिकेवर मार्गदर्शन
बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या सौ. जया राघोर्ते यांनी मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तणाव व नैराश्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच बदलत्या शिक्षणपद्धतीमध्ये पालकांची भूमिका आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
केंद्राचा परिचय सौ. अश्विनी देशमुख यांनी करून दिला. तसेच मानसिक आजारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी योग्य माहिती, पुनर्वसनाचे महत्त्व व गरज यावर मार्गदर्शन केले.मानसोपचार तज्ञ संघटना यांच्यामार्फत  सुसाईड प्रीवेंशन वरील  क्लिप सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. यामध्ये आत्महत्या करण्यामागच्या भावना, त्याला प्रवृत्त करणारी विचारधारा, तसेच आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना अशा विषयांवर अनेक डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
प्रश्नमंजुषेतून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन
कार्यक्रमाच्या शेवटी मानसिक आरोग्यविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य, मानसिक आजार आणि त्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेजमधील सर्व कर्मचारीवर्गाने सहकार्य केले. तसेच बाबा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या टीममधील स्वप्निल वर्दे आणि अक्षय बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
मानसिक आजारांविषयी गैरसमज दूर करणे, मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींना योग्य वेळी योग्य मदत व उपचार मिळण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या जनजागृती कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

    Post Views:  2


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व