विश्वासपात्र कृतिशील वाटचाल हेच लोकस्वातंत्र्यचे यश- राजेन्द्र देशमुख*


 विश्व प्रभात  20 Oct 2025, 9:43 AM
   

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५० वा मासिक विचार मंथन मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.*
*सागर लोडम यांच्या वऱ्हाडवृत्त दिपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन*
*गिरधारीलाल सारडा,प्रा.प्रकाश डवले, अॕड.धूत, जे.टी.वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती* 
*शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,व ईतरांसह माहिती अधिकारी स्व.अर्चना शंभरकर यांना श्रध्दांजली*
अकोला* - पत्रकार व  समाज हक्क आणि कल्याणाच्या वाटचालीसोबतच भरगच्च उपक्रमांची शिस्तबध्द कृतिशील वाटचाल हेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या यशाचे गमक आहे.असे प्रतिपादन  लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय सचिव राजेन्द्रबाप्पू देशमुख यांनी केले. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या मासिक कार्यक्रमांचे अर्धशतक पूर्ण झाले.त्या ५० व्या विचार मंथन मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.डवले शिक्षण समुहाचे प्रा.प्रकाश डवले हे प्रमुख अतिथी म्हणून तर वाशिम येथील ज्येष्ठ सेवाव्रती,गजानन कृषी बाजारचे संचालक गिरधारीलाल सारडा, लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,अॕड नितीन धुत,मानवधर्म पतसंस्थेचे अध्यक्ष जे.टी.वाकोडे,यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रा.डवले व सर्व प्रमुख उपस्थितांनी पत्रकार महासंघाला कृतिशीलतेचा बहूमान मिळवून देण्यामागे अध्यक्ष संजय एम.देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचा व संघटनेच्या "लोकस्वातंत्र्य" या नावाचा भावनिक शब्दांनी गौरव केला. यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा संजय देशमुख यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.पत्रकार कल्याणाच्या अनेक विषयांवर चर्चा होऊन या विविध मागण्यांचे आमसभेच्या ठरावांसह शासनाला स्मरण करून द्यावे असे यावेळी ठरविण्यात आले. 
     याप्रसंगी सर्वप्रथम पत्रकार महासंघाचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,पत्रकार,आत्महत्याग्रस्त,शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला बळी,आपत्तीग्रस्त,तथा पालघर जिल्हा माहिती अधिकारी स्व.सौ.अर्चना शंभरकर- गाडेकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.अतिथी व उपस्थितांचे सन्मानचिन्ह,शाल देऊन, पुष्पगुच्छांनी सन्मान करण्यात आले.सारडाजी आणि प्रा.डवले यांना राज्य मार्दर्शक पदाधिकारी तथा संघटक म्हणून नियुक्तीपत्रे व ओळखपत्र प्रदान करण्यात आली.सामाजिक सेवासंघात डॉ.नितीन पवार यांचेसह ईतर ओळखपत्र देण्यात आली.नरेन्द्र देशमुख,व पुरस्कारप्राप्त सौ‌.सुनंदा पंजाबराव वर यांचे सत्कार करण्यात आले.पत्रकार हितासाठी  पदाधिकाऱ्यांनी शासन,प्रशासनामध्ये विश्वासाचे भावनिक स्नेहबंध निर्माण करून लोकस्वातंत्र्यची एक वेगळी ओळख निर्माण करावी अशा अपेक्षा प्रास्ताविकातून अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.दिनदर्शिका प्रकाशन,राष्ट्रीय अधिवेशन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण या आगामी उपक्रमांची माहिती देण्यात आली.सागर लोडम यांच्या वऱ्हाडवृत्त दिपोत्सव विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
      या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,प्रा‌.डॉ.संतोषभाऊ हुशे,पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार,सिध्देश्वर देशमुख,डॉ.विनय दांदळे,प्रा‌.राजाभाऊ देशमुख,संजय कृ.देशमुख, गजानन हरणे,श्रीकृष्ण माळी, नारायण अंधारे,संदिप देशमुख,पंजाबराव वर,सौ.दिपाली बाहेकर,सौ.सुनंदा वर,सागर लोडम,सतिश देशमुख,मनोहर मोहोड, दिलीप नवले,नरेन्द्र देशमुख,रमेश समुद्रे,फुलचंद वानखडे,अमित इंगळे,अशोककुमार पंड्या, अनंतराव देशमुख,डॉ.मिलींद पवार,धारेराव देशमुख, डॉ गौरव देशमुख,अॕड.संकेत देशमुख,सुरेश तिडके,अनंत महल्ले,वसंतराव देशमुख,देवीदास घोरळ,पि.एस.देशमुख,शिवशंकर भोयर,गजानन थोरात, दिपक शिरसाट,डॉ‌.मनोहर घुगे, डॉ.अशोक शिरसाट,प्रा.विजय काटे,रविद्र देशमुख,प्रशांत कोले,पि.एल जामोदे व अनेक पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन प्रा.देवबाबू लूले तर बहारदार आभारप्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

    Post Views:  88


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व