मेहेरबानू कॉलेजमध्ये गरब्याचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Sep 2025, 8:04 AM
   

दरवर्षीप्रमाणे यंदाही  अकोला गुजराती समाज द्वारा निर्मित अकोला गुजराती नवरात्री उत्सव समितीच्या वतीने  मेहरबानू कॉलेजच्या प्रांगणात भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या गरबा महोत्सवासाठी आयोजकांनी उत्कृष्ट व्यवस्था केली असून विविध स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके सुद्धा दिली जाणार आहेत. लहान मुलींसाठी विशेष व्यवस्था असणार असून, त्यांच्याही विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. उत्कृष्ट समूह नृत्य, उत्कृष्ट वस्त्र परिधान, उत्कृष्ट नृत्य, अशा विविध गटात पारितोषिके दिली जाणार आहेत. नवरात्रातील नऊ दिवस चालणाऱ्या या गरबा  महोत्सवात अष्टमीच्या दिवशी विशेष व्यवस्था केली जाणार आहे .
विशेष म्हणजे गुजरात मधील राजकोट येथील सुप्रसिद्ध गरबा किंग यांचा आर्केस्ट्रा हे या गरबा महोत्सवाचं आकर्षण असणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या महोत्सवासाठी गुजराती नवरात्री उत्सव समितीच्या वतीने उत्कृष्ट आयोजन केल्या गेलेला आहे. केवळ महिलांसाठी असणाऱ्या या गरबा महोत्सवात इतरही समाजातील महिलांना प्रवेश दिल्या जाणार आहे. या गरबा महोत्सवात गुजराती समाजातील महिलांसह इतरही महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन गुजराती नवरात्री उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

    Post Views:  64


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व