सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किरणजी सरनाईक यांच्या निवडणूक नियोजनार्थ शिवसेना अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आज रत्नम लॉन्स, जठारपेठ, अकोला येथे अत्यंत उत्साही आणि भारलेल्या वातावरणात पार पडली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी, उपनेते गोपीकिशन बजोरिया जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,अश्विन नवले महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किरणजी सरनाईक होते तसेच वाशीमचे जिल्हाप्रमुख ठाकरे संजना गवळी,उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ म्हैसने उमेश आप्पा भुसारी,योगेश अग्रवाल जिल्हा समन्वयक बादलसिंग ठाकूर, तालुका प्रमुख विजय वानखडे, प्रकाश गिते, बालू भाऊ बगाडे, प्रवीण वैष्णव संजय आढवू, रमेश गायकवाड तालुका संघटक रमेश थुकेकर जिल्हा सचिव सतिश गोपनारायण उपशहर प्रमुख स्वप्नील देशमुख अमोल कुलेकर गोपाल काकड, प्रशांत गावंडे आकाश वकटे संजय रोहनकार राजू विल्हेकर तसेच महिला आघाडी, युवासेना आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती, सूक्ष्म नियोजन आणि प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आमदार किरणजी सरनाईक यांच्या विजयाचा संकल्प करत सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
Post Views: 52