लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात संघटन वाढ व आर्थिक सक्षमतेवर चर्चा


 Chief editor  2021-11-15
   

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा दर महिण्याचा विचारमंथन मेळावा आज संपन्न झाला.प्रत्येकवेळी केन्द्रीय व विभागीय पदाधिकाऱ्यांपैकी नविन सभाध्यक्ष निवडण्याच्या संकल्पनेनुसार केंन्द्रीय मागदर्शक तथा सल्लागार पदाधिकारी मा.श्री संतोषभाऊ हूशे यांना अध्यक्षस्थानी विराजमान करण्यात येऊन या नविन पध्दतीची सुरूवात करण्यात आली. 

यामध्ये सर्वप्रथम पत्रकार महासंघाचे सभासद, व सध्या एस‌.टी . संपावरील व्यंगचित्रावरून ज्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेची,कला कौशल्याची वृत्तपत्रांनी भरपूर दखल घेतली, त्या शुमम् बांगडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

त्यांना पुष्पगुच्छ,ग्रामगीता,अभिनंदन पत्र व त्यांचे सभासदत्व आय कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले‌‌. त्याचप्रमाणे अकोला जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री‌ नंदकिशोरजी चौबे,कोषाध्यक्ष राहूल राऊत,प्रसिध्दी प्रमुख श्री मंगेश चऱ्हाटे यांची नियुक्तीपत्रे व केंन्द्रीय पदाधिकारी अॕड‌.श्री राजेशजी जाधव व सभासद रविन्द्रजी देशमुख यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली‌.

पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी संघटनेसाठी सभासद वाढ व निधी संकलनासाठी केन्द्रीय,विभागीय व जिल्हा पदाधिकारी व ज्यांची या कामी योगदान देण्याची तयारी असेल त्या सभासदांना सुध्दा संटनेच्या सामाजिक आणि पत्रकारिता उपक्रमासाठी आर्थिक मदती गोळा करण्याकरीता समोर येण्याचे आवाहन केले. प्रसंगी त्यांनी केन्द्रीय कोषाध्यक्ष श्री किशोरजी मानकर व विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख श्री‌.सिध्देश्वरजी देशमुख यांनी निधी संकलनास व त्यांचेसोबतच केन्द्रीय पदाधिकारी सौ.जया भारती यांनी सभासद फॉर्म भरण्यास सुरूवात केल्याचे सांगीतले.महाराष्ट्रातील ठीकठीकाणच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा सभासदांच्या माध्यमातून संघटन वाढ करून संघटनेला आर्थिक निधी सुध्दा मिळवून देण्याचे काम सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली.आपण स्वत: सुध्दा चार सभासदांचे फॉर्म भरले असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. संघटनेचे ८० जी,१२ए व एनजीओ प्रमाणपत्र मिळाल्यावर मोठ्या आर्थिक मदती स्विकारल्या जातील असे पुढील नियोजन त्यांनी स्पष्ट केले.त्याचप्रमाणे २६ जानेवारीचा त्यांच्या विश्वप्रभात वृत्तपत्राचा विशेषांक व संघटनेची दिनदर्शिका काढून त्याला सर्वांनी दिलेल्या जाहिरातीतून जाहिरात कमिशन व छपाई खर्च वजा करून कॅलेंडरची संपूर्ण व विश्वप्रभातमधून ५० टक्के रक्कम पत्रकार महासंघाला देण्याचा संकल्पही यावेळी जाहीर केला.

अध्यक्षांनी मांडलेल्या संकल्पना आणि अपेक्षांना सभाअध्यक्ष प्रा.डॉ.श्री संतोषभाऊ हूशे यांनी समर्थन व्यक्त करून संघटनेला आर्थिकदृष्ट्या सुदृढ करण्याकरीता व सभासद वाढी व्दारे संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन आपल्या अध्यक्षिय मनोगतातून केले.
या विचारमंथन मेळाव्याला सभावृतान्तामध्ये उल्लेख झालेल्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त केन्द्रीय उपाध्यक्ष सर्वश्री प्रदिपभाऊ खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख, अॕड नितीनजी अग्रवाल, कादंबरीकार पुष्पराजभाऊ गावंडे,अकोला जिल्हाध्यक्ष विवेक मेतकर उपाध्यक्ष मोहन शेळके, मनोज देशमुख,सतिश देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,राधा जोशी ई.सभासद उपस्थित होते.

    Post Views:  516


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व