ऑपरेशन प्रहार अंतर्गत वाहतूक शाखेची अवैध पेट्रोल-डिझेल वाहतुकीवर धडक कारवाई


लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2026, 10:21 AM
   

अकोला :  जिल्हा व शहर वाहतूक शाखेच्या  पोलीस निरीक्षक विलास पाटील  यांना अवैध जीवनावश्यक वस्तू पेट्रोल ऑटो रिक्षा मध्ये वाहतुकी बाबत गुप्त माहिती मिळाली . या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षण विलास पाटील यांनी आपल्या पोलीस स्टेशन स्टाफसह बाळापूर नाका ते वाशिम बायपास रोडवरील हुसेनी मॉल समोर सापळा रचला. यावेळी एक ऑटो क्रमांक MH 30 BC 6661 हा संशयास्पद रित्या येताना दिसला त्याला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात मधे २८० लिटर पेट्रोल अवैध रित्या साठवून वाहतूक करताना आढळून आले.  सदर ऑटो मालकाला त्याचे नाव व पत्ता विचारले असता
शेख इम्रान शेख कयूम (वय २८ वर्षे, राहणार - बाळापूर नाका, अकोला असे सांगितले त्याच्याजवळून एक ऑटो व 280 लिटर पेट्रोल असा एकूण 3 लाख 35 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे  आरोपीला जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे  .
 या प्रकरणी आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदर कारवाही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील , पोलीस हवालदार कदीर गवळी , पोलीस कॉन्स्टेबल अच्युत वानखडे योगेश चौधरी , महेश पाचपिल्ले , ऋषभ शर्मा ,  चालक अविंद्र खोडे , ट्राफिक ब्रांच यांनी केली

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व