लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून स्व.जांभेकरांना अभिवादन


महात्मा पुस्तकाचे विमोचन....पत्रकार दांदळे यांचेवरील खोट्या गुन्ह्यासंदर्भात आयुक्तांना कळविण्याचा न
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Jan 2023, 2:39 PM
   

अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून आयोजित पत्रकार दिन समारंभ स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अकोल्यातील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष श्री प्रदिपजी खाडे होते.पसायदान मासिकाचे संपादक प्रा.श्री.सुरेशजी कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक श्री.गजानन हरणे व लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख( निंबेकर) यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम आद्यपत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर व माता सरस्वतीच्या प्रतिमेला हारार्पण करून वंदन तथा अभिवादन करण्यात आले.उपस्थित पत्रकारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या व नुतन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्यात.

                     संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष श्री‌.संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या मुल्याधिष्ठीत पत्रकारितेचा परिचय दिला.श्री.गजानन हरणे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. श्री प्रदिपजी खाडे यांनी स्व.जांभेकरांची आदर्श पत्रकारिता अधोरेखित करून तशा वाटचालीची  वर्तमानातील सामाजिक गरज विषद केली. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघांच्या पत्रकार कल्याण कार्याचा आपल्या अध्यक्षिय भाषणातून उल्लेख केला.यावेळी प्रा.डॉ.संतोष हूशे व पत्रकार संजय निकस यांनी वाचनसंस्कृतीच्या दालनात नव्याने सादर केलेल्या महात्मा ज्योतिबा फूले यांच्या जीवनकार्यावरील "महात्मा" या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संग्रामपूर येथील पत्रकार श्री.ज्ञानेश्वर दांदळे पाटील यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या संदर्भात बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाची माहिती श्री संजय देशमुख यांनी दिली.यासंबंधी पोलिस आयुक्तांना कळविण्यासंबंधीचा ठराव कार्यक्रमापूर्वी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत पारित करण्यात आला.
           या कार्यक्रमाला केंद्रीय सचिव श्री.राजेन्द्र देशमुख,उपाध्यक्ष श्री.किशोर मानकर,श्री.सिध्देश्वर देशमुख,प्रा.डॉ.श्री.संतोषजी हूशे,कादंबरीकार श्री.पुष्पराज गावंडे,श्री.अंबादास तल्हार,अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,विदर्भ दूतचे संपादक श्री.संजय निकस, सागर लोडम,,सतिश देशमुख,दिलीप नवले,पंकज देशमुख, विष्णू नकासकर, व ईतर पत्रकार उपस्थित होते.आभारप्रदर्शन सचिव श्री.राजेन्द्र देशमुख यांनी केले.

    Post Views:  165


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व