महाबिज संचालक पदासाठी डॉ. रणजीत सपकाळ यांच्या उमेदवारीने भागधारक शेतक-यांमध्ये प्रचंड उत्साह
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
09 Jul 2022, 6:15 PM
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबिज) कृषक भागधारकांमधुन निवडून द्यावयाच्या दोन संचालकापैकी, अकोला (विदर्भ विभाग) मतदार संघातून संचालक पदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी अकोल्याचे प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. रणजीत सपकाळ हे संचालक पदाचे उमेदवार आहेत. आज (दिनांक ८ जुलै २०२२) रोजी अकोला येथे भागधारक शेतक-यांची सभा सपंन्न झाली. सभेला मोठ्या प्रमाणात उत्साहाने भागधारक शेतकरी उपस्थीत होते. उपस्थीत सर्व भागधारक शेतक-यांनी डॉ. रणजीत सपकाळ यांच्या संचालक पदाच्या उमेदवारीसाठी पाठींबा दिला. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने संचालक पदाचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला असून दिनांक ४ जुलै २०२२ पासून उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात येत असून डॉ. रणजीत सपकाळ यांनी पहील्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतल्याचे समजते, यापुर्वी उच्च विद्याविभुषीत प्रगतीशिल व प्रयोगशील शेतकरी असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी सलग ४ वेळा सदर संचालक पद भुषविण्यासोबत त्यांचे कार्यकाळात महाबीज संस्था सतत अग्रेसर राहीली असून शासनाच्या अधिनस्त असलेल्या संस्थापैकी एकमेव नफ्यामध्ये असणारी ही संस्था आहे. शेतक-यांना माफक दरात दर्जेदार व शाश्वत बियाणे उपलब्ध करून देण्यासोबत महाबीजची शेतक-यांप्रती असलेली भुमिका व ग्रामिण कृषी आर्थिक व्यवस्थेच्या बळकटी करणाची सांगड कशी असावी याबाबतचा ठसा खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या कारकिर्दीत उमटवला आहे. डॉ. रणजीत सपकाळ हे खासदार संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय असून त्यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास व अनुभव दांडगा आहे. डॉ. रणजीत सपकाळ हे माजी राज्यमंत्री स्व. निळकंठ उपाख्य नानासाहेब सपकाळ यांचे सुपूत्र असून त्यांना राजकीय व सामाजिक सेवेचा वारसा लाभलेला आहे. ते अनेक सामाजिक संस्थामधे कार्यरत आहेत डॉ. सपकाळ कृषी क्षेत्रात राबता असून प्रयोगशील शेतकरी म्हणून ते सर्व ज्ञात आहेत. खासदार संजयभाऊ धोत्रे यांची शांत, अभ्यासू, मितभाषी संचालक अशी कारकीर्द डॉ. रणजीत सपकाळ यांचे रूपाने लाभणार असल्याने भागधारक शेतकरी समाधानी आहेत. मागील ३,४ महिन्यापासून डॉ. सपकाळ यांनी सर्व भागधारक शेतक-यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे. महाबीज संस्थेच्या संचालक पदी अभ्यासू आणि शेतकरी व कृषी क्षेत्राची जाण असणारी व्यक्ती असावी ही काळाची गरज आहे. अशी लाभधारक शेतक-यांना इच्छा आहे. संचालक पदाच्या निवडणुकीची सुचना दिनांक ४ जुलै २०२२ रोजी प्रसारीत झाली आहे. दिनांक ५ ऑगष्ट २०२२ रोजी मतपत्रिका स्विकारण्यात येतील तसेच दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी व निवडणुक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
स्व. निळकंठ उपाख्य नानासाहेब सपकाळ हे सन १९७५ ते १९७७ या काळात राज्याचे कृषी, सहकार व ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री असतांना त्यांचे कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) स्थापना केली. तसेच महाबीज संस्थेचे मुख्यालय अकोला येथे स्थापीत केले. ग्रामिण व कृषी क्षेत्राचा विकास करणे हा त्यांचा आत्मीयतेचा विषय होता.
Post Views: 353