लोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.
अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंबरमध्ये शुभारंभ!
अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सामाजिक उपक्रम आणि पत्रकार व समाजकल्याणाच्या कार्यात सदैव सक्रिय राहून प्रश्न सोडवणारी एक कर्तव्यदक्ष संघटना आहे.म्हणूनच कार्यक्रमातील सभासद उपस्थितीचा उच्चांक कायम ठेवत एक कृतिशील संघटना म्हणून ६ राज्यात प्रवेश आणि राज्यात परिचित झाली झाली आहे.असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६१ वा पत्रकार मासिक विचारमंथन मेळावा तथा सन्मान,मार्गदर्शन व पुरस्कार आणि आय कार्ड वितरण समारंभ नुकताच स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवी दिनेश शुक्ला होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सहकारी संस्थांच्या प्रभारी तालूका उपनिबंधक व "पदुम" च्या सहनिबंधक सौ.ज्योतीताई मलिये व होमियोपॅथीतील सेव भावी डॉक्टर व समाजसेविका सौ.कल्याणी पवित्रकार ह्या होत्या.
वाशिमचे ज्येष्ठ समाजसेवी गिरधारीलाल सारडा,डॉ.शंकरराव, सांगळे,प्रबोधक जीवनराव देशमुख,शैक्षणिक व सामाजिक सेवाव्रती प्रा.प्रकाश डवले,लोकस्वातंत्र्याचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी कार्य गौरव म्हणून डॉ.शंकरराव सांगळे यांना "लोकस्वातंत्र्य सामाजिक व राष्ट्रसेवा जीवनगौरव तर जीवनराव देशमुख यांना "प्रबोधन व सामाजिक सेवा जीवनगौरव" या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.प्रा.सुरेश कुलकर्णी यांचृया पसायदानामृत मासिकाच्या विशेषांकाचे विमोचन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमाला ८० पत्रकार व विचारमंथन सभासद उपस्थित होते.याप्रसंगी नवीन सभासदांना आय कार्ड वितरण करण्यात आले.
यावेळी लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी संघटनेची वाटचाल,उपक्रम आणि शासन- प्रशासनाकडून वेळोवेळी मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती दिली.अधिस्विकृतीधारक पत्रकारांना शिवाईसह सर्वच बसमधून प्रवास सवलती संदर्भात परिवहन मंत्री ना.प्रतापराव सरनाईक यांनी यासाठी शासन सकारात्मक असल्याचे व याबाबत परिवहन महामंडळाकडून संघटनेला पत्र प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेंद्र देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,पुष्पराज गावंडे,सिध्देश्वर देशमुख,अंबादास तल्हार,सौ.जया भारती,संदिप देशमुख हे राष्ट्रीय पदाधिकारी तथा के.व्ही.देशमुख,डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे,प्रा.विजय काटे,सुरेश पाचकवडे,प्रा.मोहन काळे,विजय केंदरकर,विनय टोले,अनंतराव देशमुख,प्रा.सुरेश कुलकर्णी,प्रकाश जोशी,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम,मनोहर मोहोड,श्रीकृष्ण माळी,सुरेश भारती,अर्जूनराव घुगे,प्रा. महादेव लुले,सागर दनोरीकर,सौ.दिपाली बाहेकर,प्रा.अशोक शिरसाट,जे.टी.वाकोडे,अभि.सुरेश तिडके,अभि.विनायक पांडे,बुढन गाडेकर,रमेश समुद्रे,अमित इंगळे,डीजे.वानखडे,नरेंद्र देशमुख,विजय देशमुख,देवीदास घोरळ,रविंद्र देशमुख,राजाभाऊ देशमुख,जयंत देशमुख,अशोक पंड्या,गजानन थोरात,देवीदास पोटे,प्रविण पट्टेबहादुर,सतिश देशमुख,प्यारेलाल यादव,कृष्णा चव्हाण,गजानन मुऱ्हे,विकास काटे,विजयराव बाहकर,वसंतराव देशमुख,नागोराव मोहोड,सोनु देशमुख,पुनित देशमुख,सुनिल दोड,फुलचंद वानखडे,सुवर्णसिंग खटोड,नितीन लोडम,दिपक शिरसाट,देवानंद ढोरे, व अकोला आणि वाशिममधील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती- इंगोले व प्रा.महादेव दुवे यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 1