भव्य मेहंदी स्पर्धा व महिला कलाकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न


जनसहयोगच्या कार्यक्रमांध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अग्रस्थान...संजय एम.देशमुख उद्घाटक!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:27 AM
   

राष्ट्रीय रत्न पुरस्कारांसह मेहंदी,मेकअप व फॅशन डिझायनर क्षेत्रातील ६८ महिला कलाकारांचा गौरव
अकोला / छत्रपती संभाजीनगर : जनसहयोग सेवाभावी संस्था,मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन आणि अली मदत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मेहंदी स्पर्धा तसेच दीर्घकाळ कला व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या महिला कलाकारांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय रत्न,प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट व फॅशन डिझायनर आर्टिस्ट अवॉर्ड सोहळा रविवार २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगरातील भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंजि.आर.डी मगर (राष्ट्रनिर्माण रत्न) तर उद्घाटक म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची उपस्थिती होती.
   विशेष अतिथी म्हणून गोदावरी पब्लिक स्कूलच्या डॉ.शुभांगी विक्रम काळे समाज कल्याणच्या  उपायुक्त डॉ.जयश्री सोनकवडे,संभाजीनगरचे  जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सय्यद गौस मोहियोद्दीन (प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर),शकीला पठाण (समाजसेविका), मराठवाडा केसरीच्या उपसंपादिका व लोकस्वातंत्र्य पदाधिकारी सौ.संगीता राजपूत,ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, समाजसेविका फरहा नाज अंजुम, जलसंपदा चे अभियंता ब्रह्मराज एस टी,शीरीन बेगम, बशीर अहमद,फरहीन मेराज अली (संयोजिका) शाहेद भय्या सिद्दिकी, युवा सलीम आळंद मान्यवर समाजसेविका ची विशेष उपस्थिती होती.
      यावेळी सुमारे ६०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कला,सौंदर्य आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
मान्यवरांच्या हस्ते १२ राष्ट्रीय रत्न पुरस्कार, ५२ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट अवॉर्ड, ११ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड, ४ फॅशन डिझायनर अवॉर्ड आणि १ कुकिंग क्वीन अवॉर्ड प्रदान करून गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमातील भव्य मेहंदी स्पर्धेत प्रथम विजेता म्हणून कु.सीमा शेख इम्रान,द्वितीय कु.अजरा शेख युसुफ तृतीय कु.बुशरा फातेमा शेख जमील यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सहभागी महिला कलाकारांना प्रोत्साहित करण्यात आले.मेहंदी स्पर्धेत जवळपास १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलाकौशल्याचे दर्शन घडविले. विविध प्रकारच्या आकर्षक व कलात्मक मेहंदी डिझाईन्स साकारत स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपारिक मेहंदी कलेसोबतच आधुनिक डिझाईन्सचेही दर्शन यावेळी घडले.
     यावेळी मेहंदी ही केवळ सौंदर्यवर्धक कला नसून अनेक महिलांसाठी स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते असे मत महाराष्ट्र शासन सामाजिक विभाग उपायुक्त डॉ.जयश्री सोनकवडे यांनी व्यक्त केले. लोक स्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी ३२ वर्षापासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करणारी जनसहयोग सेवाभावी संस्था व संस्थापक अध्यक्ष महेमुद भाई व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.तसेच मेहंदी कलेच्या विकासासाठी अशा स्पर्धा व उपक्रम सातत्याने आयोजित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.मेहंदी स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध मेहंदी आर्टीस्ट गुलनाज शीरीन,अर्शिया मेराज अली,फारिहा शेख यांनी काम पाहिले .
      या भव्य मेहंदी स्पर्धेला मेहंदी कलाकार तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन अन्सारी जावेद अहमद आणि इन्फ्लुएन्सर कु.पठान अफीना यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक महेमूद खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.
      महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. उपस्थित महिला कलाकार, नवोदित कलाकारांना संधी आणि महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

    Post Views:  32


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व