पसायदानामृत दिवाळी अंकाचे विमोचन उत्साहात संपन्न....


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Oct 2022, 9:54 AM
   

अकोला -  स्व. वसंतराव कसबेकर स्मृती व्याख्यान आणि पसायदानामृत विमोचन अशी परंपरा कायम ठेवून पसायदानामृत दिवाळी अंकाचे विमोचन अकोला अर्बन बँकेचे स्व.वसंतराव कसबेकर स्मृती सभागृहात 21 ऑक्टोबरला उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी अकोला अर्बन बँकेचे चेअरमन रामेश्वर फुंडकर होते. तर प्रमुख वक्ते श्रीकांत देशपांडे हे होते प्रमुख अतिथी राजेंद्र देशमुख होते. विमोचन करताना मान्यवरांनी अध्यात्माला वाहिलेल्या पसायदानामृत मासिकाला उच्च दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल संपादक प्रा. सुरेश कुलकर्णी यांचा गुणगौरव केला. राजेंद्र देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रा .सुरेश कुलकर्णी माउलीमय झाल्याचे सांगितले. आपल्या प्रमुख भाषणात श्रीकांत देशपांडे यांनी स्व वसंतराव कसबे करांच्या शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी राष्ट्रनिष्ठांची मांदीयाळीच तयार केल्याचे  त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा सुरेश कुलकर्णी यांनी तर बहारदार सूत्रसंचालन प्रकाश जोशी यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये रामेश्वर फुंडकर यांनी सप्तर्षीचे राष्ट्रीय कार्यावर प्रकाश टाकला नांदुरा अर्बन बँक घटनाक्रमाचा मी साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश जोशी यांनी आपल्या मनोगतामध्ये संतांच्या दिवाळी बाबत विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अतिरिक्त मुख्य सचिव अभि.विनायकराव पांडे, पसायदानामृत मध्ये सातत्याने लेखन करणारे प्रा यादव वक्ते, अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे, अकोला महानगर जेष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी, वसंतराव देशमुख, अशोक भन्साळी गजानन देशपांडे राजेश्वर मुंजे, अनंत अंधारे अर्बन बँकेचे पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती शितल वैद्य यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. अँड पूर्वा गजके यांनी गायीलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

    Post Views:  252


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व