आकोट- हिवरखेड ते जळगाव जामोद रस्त्याचे नित्कृष्ट काम धोकादायक
भ्रष्टाचारासाठी बोगस काम करणारांवर कार्यवाही करण्याची श्रीरंग पिंजरकर यांची मागणी
अकोला- अकोला जिल्ह्यातील अकोट- हिवरखेड ते जळगाव जामोद रस्त्याचे व पुलाचे बांधकाम नियमानुसार होत नसून या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षेच्या अपुऱ्या उपाय योजनांच्या भावी जीवाला मुकावे लागत असल्याची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी केली आहे.त्यांनी याबाबतची सविस्तर तक्रार कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नागपूर तथा अधीक्षक अभियंता सा.बां.विभाग.अकोला यांच्याकडे पाठविली आहे.
या रस्त्यावर टाकण्यात येत असलेला मुरूम हा माती मिश्रीत आहे.तोच मातीचा मुरूम रस्त्याच्या बाजूला तसेच रस्ता बांधकामात वापरण्यात येत आहे. आताच काम केलेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर अनेक ठिकाणी गिट्टी उखडली असून लहान लहान खड्डे पडलेले आहेत. रस्त्याच्या साइड भरताना वॉटर क्यूरिंगसाठी वापरण्यात आलेले बोंद्र्या / पोते जीर्ण झालेले आहेत. त्यातच हा मातीचा मुरूम टाकण्यात येत आहे, तसेच तयार झालेल्या रस्त्यावरून काही ठिकाणी वाहतूक दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असून सुरक्षा उपाय योजना केलेल्या नाहीत.
रस्त्यावर अंतर्गत कुठे बॅरिकेट किंवा रोडच्या साइडला रेडीयम पट्ट्या असलेले पोते नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन धारकांला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या साईड बांधकामाच्या काही भिंतीच्या खालील भागात बांधकामा मधील लोहा उघडा पडला असून काँक्रीटला तडा गेल्याचे दिसून येते आहे.यावरून सदर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे निर्देशात येत असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणातून किंवा कामात होत असलेला भ्रष्टाचार करण्यासाठी असले प्रकार होत असल्याचे अधोरेखित होते. सध्याचे आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी संपूर्ण कामाची चौकशी करून जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.अपुऱ्या सुरक्षा योजनांअभावी अपघात होऊन जीवित हानी झाल्यास काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Post Views: 24