सामाजिक कार्यकरर्ते देवेंद्र मेश्राम यांच्या निवासस्थानी बाप्पांचे उत्साहात आगमन !
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Sep 2026, 3:58 PM
(देवेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी)
बोईसर - आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र मेश्राम यांचे निवासस्थानी बोईसर येथील धनानी नगर येथे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात बाप्पाचे मोठ्या उत्साहात दिड दिवसासाठी आगमन झाले. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बाप्पांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यात बोईसर ग्रामपंचायत चे उपसरपंच निलम संखे, मा. पंचायत समिती सदस्य पप्पू संखे,बोईसर ट्राफिक इन्चार्ज प्रशांतजी खैरनार आणि त्यांची टिम,राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला बाल विकास आयोग चे राष्ट्रीय सचिव डॉ रवींद्र मिश्र, बजरंग दल प्रमुख चंदन सिंह, आनंद, मनीष सिंह,दीक्षित सिंग,विप्र फाउंडिशन प्रमुख ब्रहदेव चौबे आणि परिवार, बिहारी संघचे प्रमुख बबन सिंग,हिंदू जनजागृती संस्थेचे अमित सिंगआणि टिम,छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळ ची संपूर्ण टीम, बीजेपी मंडळ सचिव मानसिंग ठाकूर, राष्ट्रीय हिंदू सेवा संघ चे सावे आणि परिवार, सुनील पाटील पत्रकार मित्र हरिओम शरण मिश्रा, ओमप्रकाश द्विवेदी, अजित सिंह, दिपक निराला,मृत्युंजय पाण्डेय,अमित कुमार दास आणि परिवार, मानस पिंपळे, शुभम चौबे,तसेच मित्रगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व पाहुण्यांचे अंग वस्त्र देऊन स्वागत करण्यात आले.आलेल्या सर्व पाहुण्यांनी दर्शन घेऊन तीर्थ प्रसाद व स्वादिष्ट महाप्रसादाचा लाभ घेतला.मेश्राम यांचे वडील एस जी मेश्राम,आई प्रभा मेश्राम,जितेंद्र मेश्राम, नितेंद्र मेश्राम, धीरेंद्र मेश्राम, प्रभा मेश्राम, छाया मेश्राम, वनिता मेश्राम,सुनयना मेश्राम. दर्शनासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे सामाजिक कार्यकर्ता तसेच आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी आभार मानले.संपूर्ण कुटुंबांनी बाप्पांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषान काल सायंकाळी बाप्पांना नांदगान येथील समुद्रा मध्ये निरोप देण्यात आला.
Post Views: 1