जि. प. कर्मचारी युनियन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध
संघटनेचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांची ग्वाही
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Mar 2026, 8:34 AM
अकोला - आज पर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देणारी जि. प. कर्मचारी युनियन भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहील. अशी ग्वाही कर्मचारी युनियनचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी दिली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनीअकोला जिल्हा परिषदेस पहिलीच भेट देऊन जि प सभागृहात संपन्न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सभेत आपले मनोगत व्यक्त करताना ही ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या युनियनचे जेष्ठ मार्गदर्शक तथा जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप खाडे होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, युनियनचे राज्य सरचिटणीस सुनील जानोरकर, राज्यस्तरीय पदाधिकारी राम मेहरे, युनियनचे जिल्हाध्यक्ष गिरीश मोगरे, सचिव राजेश मालगे, माजी अध्यक्ष विलास वरोकार, मधुकर बेलूरकर, मुकुंद पवनीकर, लेखा कर्मचारी संघटनेचे गजानन उघडे, रवींद्र मानकर, अभिजीत बन्नोरे, गजानन लव्हाळे विचार मंचावर उपस्थित होते.
पुजरवाड आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी सुधारणे सोबतच इतरही मागण्यांसाठी आपली महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यां सोबत व इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
प्रारंभी सुनील जानोरकर यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या बळकटीसाठी सर्वांनी मनोभावे साथ द्यावी असे आवाहन केले.
प्रदीप खाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युनियनचे संस्थापक अध्यक्ष स्व. म. वा. ओंकार, माजी अध्यक्ष बलराज मगर यांच्या कार्याचा गौरव करून कोणत्या मुख्यमंत्र्यांनी संघटनेस किती सहकार्य केले याची सविस्तर माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गिरीश मोगरे, राम मेहरे यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेस महिला कर्मचाऱ्यांकरिता अधिक सक्षमतेने कार्य करता यावे यासाठी एक स्वतंत्र महिला संघटना तयार करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी सामान्य प्रशासन विभागातील अधिक्षिका भारती देशमुख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राज्याध्यक्ष पुजरवाड, दिगंबर लोखंडे व इतरही पदाधिकाऱ्यांचे हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सभेस पुष्पक शहाणे, संतोष ताथोड, प्रवीण साखरे, तुषार पत्की, सुमेध चक्रनारायण, ओम प्रकाश बरेठी, शिरीष कुकडे, विनीत खंडारे, महादेव शिंदे, मेजर खडसे कैलास मसने, गजानन आगरकर, मोहम्मद कमरूजमा, भारती देशमुख, शकुंतला चौबे, स्मिता नालींदे, वंदना मेश्राम, उषा खेडकर, प्रीती खेडकर, शितल नाकट, सोनल सरोदे, अलकनंदा खर्चे, दिपाली गिऱ्हे, वैशाली ठाकूर, सरोज सावरकर, अमोल सानप, एस. एस. भटकर, संजय पातोडे, गजानन भोंडने, निलेश जामनिक, अविनाश बेलोकार, गजानन खंडेराव, प्रदीप धाडसे, परीक्षित कानडे, श्रीकांत खोंड, महादेव साबळे, गजानन गायकवाड, अमोल थोरात, डी., व्हि. पराते, सुनील भातुलकर, देवनाथ गुट्टे, प्रवीण जामनिक, कैलास नगराळे, अविनाश वाघ, सचिन देशमुख, अमोल पुंडकर, महेश रोठे, संतोष कावरे, प्रशांत कोकणे, दिनेश काटे, वीरेंद्र कुमार महाजन, धनंजय मसने यांचे सह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संतोष ताथोड यांनी केले.
Post Views: 5