ग्रीन परभणीच्या वृक्षरोपणात नागरिकांचाही उत्सुर्फ प्रतिसाद


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Jul 2024, 2:07 PM
   

परभणी : हरित परभणी प्रदूषणमुक्त परभणी ही संकल्पना समोर ठेऊन स्थापन झालेल्या ग्रीन परभणी वृक्ष टीमच्या आजच्या वृक्षरोपणात शारदा नगर , भाग्यलक्ष्मी नगर  वसाहतीतील  नागरिकांनी  उत्सुर्फ सहभाग नोंदवला.       लातूरच्या धर्तीवर परभणीत स्वनिधी उभारून  शहराला हरित परभणी करून प्रदूषण मुक्त तथा नागरिकांना नैसर्गिक ऑक्सिजन उपलब्ध करने असा ध्यास घेऊन ग्रीन परभणी वृक्ष टिम ची स्थापना करण्यात आली आहे . यातील प्रत्येक सदस्य आपल्या यथाशक्तीनुसार मासिक निधी देत आहेत. या स्वनिधीतून  वृक्ष व खत खरेदी करणे, खड्डे तयार करणे आदी कामे होत आहेत. ही वृक्ष टीम दर शनिवारी विविध भागात वृक्षरोपण करणार आहे त्याची सुरवात गेल्या शनिवारी श्रीराम मंदिर परिसर आणि वसाहतीत केली  होती . आज गजानन महाराज मंदिर परिसरात 25 वृक्षाचे ज्यात वड,पिपंळ, आवळा, चिंच,बेल असे बहुपयोगी वृक्षाचा समावेश होता . विशेष म्हणजे यावेळी शारदा नगर तसेच भाग्यलक्ष्मी नगर परिसरातील नागरिक मोठया संख्येने या वृक्षरोपणात सहभागी झाले. दर शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

    Post Views:  113


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व