नागपूर येथील लुंबिनी बुद्ध विहारात पंजाबराव वर सन्मानित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2026, 8:26 AM
अकोला : लुंबिनी बौद्ध सेवा समिती नागपूर द्वारा संचालित लुम्बींनी बुध्दवीहार सेवा समिति मानकापुर विहारात रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी सांयकाळी वर्षावासनिमीत ध:म्मचारी ललित मित्र यांचे धम्म प्रबोधन कार्यक्रमात अकोला येथील संपादक तथा साहित्यिक ‘गाथा रमाईकार’ पंजाबराव वर सन्मान करण्यात आला. यावेळी नागलोक येथील धम्मचारी ललितमित्र, धम्मचारी क्षांतीप्रभा, राजू काळे, यावेळी धम्मचारी ललितमित्र यांचा परिचय धम्मचारी क्षांतिप्रभा यांनी करून दिला, तसेच साहित्यिक तथा नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांचा परिचय सुनील निरंजने यांनी करून दिला. याव़केळी बोलत़्काांना पंजाबराव वर म्हणाले की, त्यागमूर्ति रमाईचा आदर्श समस्त महिलांनी घेतल्यास त्यांचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. महामाता रमाईचा त्यागमय जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात विचार मांडले. तसेच प्रतिबुद्ध बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या नाग नगरीमध्ये येवून बोलण्याची संधी मिळाल्याने आपल्यावर महामानवांचे अनंत उपकार असल्याचे म्हणाले. या उभयतांनी आपल्या मुला-बाळाची समाजासाठी आहूती दिली त्यामुळे समाजात फूट पडणार नाही अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. या पावन नगरीत तसेच लुंबिनी बुद्ध विहारात माझा सन्मान झाल्याने मी स्वत:ला धन्य समजतो व सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळी पंजाबराव वर लिखीत त्यांचे ‘गाथा रमाईची’ पुस्तके उपासक-उपाशिकांनी विकत घेतले. कार्यक्रमाला संस्थापक सचिव फूलचंदजी टेंभूर्णे, अध्यक्ष दीपकजी फुलझेले, उपाध्यक्ष : प्राणनाथ भिवगडे, सचिव सुखदेव मनोहरे, सहसचिव अशोकजी बागडे, कोषाध्यक्ष अभिजीत कांबळे, चंद्रमणी डोंगरे,सुनील निरंजने यांची उपस्थीत होती़ कार्यक्रमाचे संचालन सुखदेव मनोहरे यांनी तर आभार प्रदर्शन आयुष्मान चंद्रमणी धोंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरीता अभिजीत कांबळे, सुनील निरंजने व महिला मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
Post Views: 1