श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Sep 2026, 8:55 AM
मुंबई : श्लोक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, सभासदहिताचे विविध निर्णय तसेच आगामी वर्षातील विकासात्मक नियोजनाबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी संस्थेचे संस्थापक माननीय अविनाश दादा पाटील तसेच अध्यक्षा सौ. सविता अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासद, पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, आर्थिक अहवाल, ताळेबंद व लेखापरीक्षण अहवाल याबाबत माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली.
सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीसोबतच सभासदांना अधिक चांगल्या आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. बचत, ठेवी, कर्जवितरण, सभासद सेवा आणि आर्थिक शिस्त या बाबींवर विशेष भर देण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक विकास साधण्याचा संस्थेचा प्रयत्न कायम राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी गुणवंत कामगार, निवडणूक निर्णय अधिकारी, प्रमाणित लेखापरीक्षक तथा विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रभाकर कांबळे यांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, सहकार क्षेत्रातील तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधील योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. प्रभाकर कांबळे यांनी सत्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी पारदर्शकता, विश्वास आणि सभासदकेंद्री सेवा महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
Post Views: 5