रत्नागीरी : येथील साईश्री नृत्य कला मंदिरात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भावपूर्ण वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम गुरु सौ. मिताली भिडे यांनी नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन केलं सर्व मुलींनी श्लोक म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर शिवानी केळकर हिने प्रस्तावना केली.
राजवी, तीर्था, श्रीशा, निहाली यांनी गुरु ब्रह्मा श्लोक म्हटला. सौम्या हिने सुंदर गुरुवंदना सादर केली.त्यानंतर भैरवी ने गुरुस्तवन सादर केले तर जुईली ने गुरु वंदना केली. नीरजा आणि अदिती ने गुरु शिष्या यांच नातं नृत्यातुन मांडलं आणि सुनिधी हिने टीचर ही इंग्रजी कविता सादर केली. राधा निहारिका ख़ुशी यांनी गुरूंबद्दल कृतज्ञतापूर्वक विवेचन केले.मुलींनी यावेळी गुरू शिष्य परंपरेतील काही गोष्टी पण सांगीतल्या. श्रद्धा पवार हिने या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.
Post Views: 204