कृष्ण जन्माष्टमी


विषय -- रात्रीच्या चांदण्यात प्रीत रंगु दे
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  18 Aug 2022, 9:01 PM
   

रात्रीच्या चांदण्यात प्रीत रंग रंगू दे
कान्हा तुझ्या  बासरीचे सूर कानी घुमू दे
मोर मुकुट तुझ्या शिरावर शोभू दे
कर्ण कुंडला चे तेज माझ्या रूपावर पडू दे.....

तुझ्या प्रेमात वेडी माझी प्रीत रे
कान्हा तुझ्या रासलिलेत होईन मी दंग
सख्या अंतरंगात प्रीत आपुली फुलू दे
हृदयाला हृदयाशी गोड गुज बोलूं दे.....

सांगू कशी वेडी माया तुजवर जडली
वेडी राधा तुला कशी नाही कळली
तुझ्या ओठांवर माझ्या नावाची लाली चढू दे
कान्हा प्रेमलीलेत मला खुलून जाऊ दे...

वेडी होती गुरे ढोरे प्रीत तुझी न्यारी
दही लोणी खाया सवंगडी जमली सारी
मनोमनी तुझ्या प्रेमाची वेल फुलू दे
कान्हा चांदराती आपुली प्रीत  रंगू दे....

अनिता देशमुख
नांदुरा(बुलडाणा)
हमू.--कल्याण

    Post Views:  186


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व