मुंबईत काशिमीरा येथे आधार प्रतिष्ठानच्या मानाच्या हंडीचा दिमाखदार सोहळा


६८ गोविंदा पथकांचा सहभाग; पाच मंडळांनी रचले आठ थर, निरबा देवी महिला गोविंदा पथकाचा सहा थरांचा विक्रम
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:12 AM
   

काशिमीरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रशांत सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या वर्ष पाचवे मानाची हंडी – काशिमीरा या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी संस्कृती, परंपरा आणि गोविंदा पथकांच्या साहसाचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्यात तब्बल ६८ गोविंदा मंडळांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर, संपर्कप्रमुख तथा उपनेते विनोद घोसाळकर, चित्रपट सेना सचिव विजय परब, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, जिल्हा संघटक नीलम ढवण ,जिल्हा सचिव सुभाष केसरकर, युवासेना जिल्हाधिकारी दिनेश गावंड, उपजिल्हा संघटिका प्राची पाटील, उपजिल्हाप्रमुख विनोद म्हात्रे, शहरप्रमुख संभाजी पालांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद, नगरसेविका यशोदा अनिल ताटे, नगरसेविका मयुरी सचिन म्हात्रे, शिवसेना पक्ष संघटक उद्धव कदम, युवा नेतृत्व आजाद पटेल व प्रदीप उपाध्याय, उद्योजक उदय पार्सेकर, रशेश मेहता व ललित अग्रवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढविला.
पाच मंडळांचे ८ थरांचे साहस
यंदाच्या दहीहंडी सोहळ्यात पाच गोविंदा मंडळांनी ८ थर रचण्याचा पराक्रम केला. राजमुद्रा आणि जय मल्हार या मंडळांना विशेष मान देण्यात आला. विशेष म्हणजे, मीरा-भाईंदरमध्ये प्रथमच निरबा देवी महिला गोविंदा पथकाने ६ थर रचून विक्रम नोंदविला. या महिला गोविंदा पथकाला मानाची हंडी देऊन गौरविण्यात आले.
सुरक्षिततेला प्राधान्य
गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांनी विशेष खबरदारी घेतली. बाल गोविंदांसाठी संपूर्ण मॅटची व्यवस्था, वैद्यकीय मदतीसाठी डॉ. राजेश पालांडे (आशिष हॉस्पिटल) व डॉ. मनोज पांडे (अशोक हॉस्पिटल) यांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वरच्या थरातील गोविंदांसाठी रोप व हेल्मेटची व्यवस्था करण्यात आली होती.
मराठी संस्कृतीचा जागर
कार्यक्रमात मराठी संस्कृती आणि पारंपरिक कलांना विशेष स्थान देण्यात आले. नृत्यसम्राज्ञी सौ. गौरी जाधव, गायक संदेश जाधव, तसेच शिंदेशाही बाणा सादर करणारे गौरव पगारे यांच्या कला सादरीकरणाने उपस्थितांचे मनोरंजन केले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कोकणातील प्रसिद्ध खालू बाजा – भैरवनाथ यांची पारंपरिक वाद्यांची साथ लाभली.
सूत्रसंचालनाने जिंकली उपस्थितांची मने
कार्यक्रमाचे सल्लागार, सूत्रधार आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री. किरण मांजरेकर यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि उत्साही निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आली आणि उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपशहरप्रमुख लहू तांबडी, शहर संघटिका मनिषा भोपळे, उपशहर संघटिका स्मिता निंबाळकर, विभागप्रमुख अनिल भोसले, नागेश शिंदे, तुकाराम भोईर, संतोष बच्चे, कृष्णा पारेकर, बळीराम डांगे, शाखाप्रमुख रोहित सपकाळ, अनंत उदेग, राहुल डोंगरे, प्रथमेश मोरे, विश्वनाथ भोईर, रमेश बाबळगावकर, युवासेना समन्वयक हर्षद राजे, मार्गदर्शक रवींद्र घोरपडे, आधारस्तंभ सुषमा ताई नाईक, कार्याध्यक्ष अनिल भोसले, सचिव संतोष बच्चे, खजिनदार संजय देसाई यांच्यासह आधार प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
तसेच नितीन म्हात्रे, मंथा यादव, मिलिंद सकपाळ, हनुमंत चव्हाण, पिंटू विश्वकर्मा, अनिल दहिंबेकर, राजकुमार आंगडे, दीपक नाकडे, चारू सुर्वे,नीरज तिवारी, विशेष सहकार्य करणारे सतीश सिंग (सचिव, मीरा-भाईंदर मेडिकल असोसिएशन), RJ राजनिश (YouTube Live), रितेश जोशी (रिल्स व फोटोग्राफी), कोकण मित्र मंडळ, गावठाण मित्र मंडळ शिवसेना परिवार, वर्सोवा आदर्श मित्र मंडळ, तसेच सतीश ढाकणे आणि शाहिद शेख (बाबा) यांचेही विशेष सहकार्य लाभले.
आधार प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेना परिवाराच्या अथक परिश्रमामुळे काशिमीरा येथील मानाची हंडी उत्साह, परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करणारी ठरली.

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व