जिल्ह्यात ३० नोव्हेंबरनंतर लसीकरण केंद्रांच्या संख्येत होणार घट: त्या पूर्वी लसीकरण करुन घ्यावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन


 Pankaj Deshmukh  2021-11-23
   

अकोलादि.२३(जिमाका)- जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. तथापि, या अभियानानंतर अभियानानिमित्त वाढविण्यात आलेली लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.  तरी नागरिकांनी दि.३० नोव्हेंबरच्या आत आपल्या घरानजिक असलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी  विशेष मोहिम राबविली जात असून आज अखेर जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या ९ लक्ष २७ हजार इतकी असून दुसरा डोस घेतलेले ४ लाख २१ हजार ७०० इतकी आहे. जिल्ह्यात १८ वर्षे वयावरील लसीकरणासाठी पात्र १४ लक्ष ३३ हजार व्यक्तिंचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सद्यस्थितीत १५० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात लोकांच्या घरांच्या जवळ, एकाच वेळी अधिक लोकांसाठी त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या नजिक विशेष सत्र आयोजित करण्यात होते. तसेच लोकांच्या सोयीनुसार लसीकरण वेळही बदलण्यात येत आहे. तथापि, अभियान कालावधीनंतर (दि.३०) वाढवलेली केंद्र संख्या कमी होईल. तेव्हा नागरिकांनी आता अधिक जवळ केंद्र आहेत तेथे लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

    Post Views:  234


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व