आळंदी - डॉक्टर गिरीजा शंकर शुक्ला यांना यंदाचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Nov 2024, 10:57 AM
पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार, व नीती आयोग संलग्नित आय एस ओ नामांकित डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने 2024 चा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार डॉक्टर गिरीजा शंकर शुक्ला जहांगाई उत्तर प्रदेश या ठिकाणी जन्म , शिक्षण पुणे मुंबई या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन अकोला येथे दामिनी आय हॉस्पिटल मध्ये यांनी आतापर्यंत 50 हजार ऑपरेशन मोफत केले का? तर आपण समाजाचे देण लागतो. ही सेवावृत्ती त्यांच्या अंगी असल्यामुळे, यांनी अनेक कंपनी व संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्य पाहिले तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष पद सुद्धा भूषवले सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लेखणीतून पुस्तकाची निर्मिती करून वाचकांना संधी दिली त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्याचा गौरव म्हणून जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा दिनांक 31 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी सायंकाळी 5 ते 8 च्या दरम्यान सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन टिंबर मार्केट,नवी पेठ,पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
Post Views: 22