अकोल्यातील महिला जिल्हाधिकाऱ्यांची अतिक्रमण हटविण्याची दबंग कारवाई...!


निमा अरोरा यांनी मोहंमदअलीरोडच्यामच्छी मार्केटचे अतिक्रमण सकाळी ३ वाजता हटविले
 संजय देशमुख  2022-02-12
   

अकोला  : शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून राजरोसपणे अतिक्रमण थाटून वर्षानुवर्षे अतिक्रमण धारक आपला व्यवसाय करीत आहेत.स्थानिक अकोला शहरातील मध्यवस्तीतील  मोहम्मद अली रोड येथे देखील अतिक्रमणाने संपूर्ण परिसर व्यापला होता. काही दिवसांपूर्वीच अकोला येथील कडक दबंग महिला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी याच ठिकाणी सकाळच्या सुमारास छापा मारून कत्तलखाने उध्वस्त केले होते. तर आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा या परिसरामध्ये अतिक्रमणाची कारवाई करून संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. पहाटे तीन वाजता झालेल्या या कारवाईची कोणाला भनक सुद्धा नव्हती. हे अतिक्रमण आजपर्यंत कोणालाही काढता आलेले नव्हते, तोडले नव्हते.ती कारवाई एका महिला अधिकाऱ्यांनी करून दाखविली‌.त्याबध्दल अकोला  शहरातील नागरीकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे‌‌. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केलेल्या या कारवाईमुळे अखेर मोहम्मद अली रोडवरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.    
                जिल्हाधिकाऱ्यांनी यानंतर शहरातील कॉम्प्लेक्स पार्किंगच्या जागेवर केलेले अतिक्रमण काढल्यास शहरात रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही. यापूर्वी विद्यमान आयुक्त आणि त्यानंतर  विद्यमान जिल्हाधिकारी असलेल्या निमा अरोरा यांनी शहरातील कॉम्प्लेक्स मधील अतिक्रमण काढण्याकरिता अकोला महानगरपालिका नगररचना विभागाला मोजमाप करण्याचे आदेश दिले होते‌.परंतू त्यानंतर त्यांचीच जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे नगर रचना विभागाने पुढील कारवाई न करता ती फाईल तशीच प्रलंबित ठेवली आहे. मनपातील अधिकारी वरीष्ठांची दिशाभूल करून नागरीकांप्रतीच्या सेवाधर्माशी प्रतारणा करीत व्यावसाईकांसोबत मधूर संबंध प्रस्थापित करण्यात तरबेज आहेत‌.सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणात स्वत:चे हितसंबंध जोपासण्याच्या अनैतिक वाटचालीला प्राधान्य देण्याच्या वृत्तीमुळेच अतिक्रमणधारकांची शिरजोरी वाढलेली आहे.  मनपातील जंपीगवाल्यांवर सुध्दा बेधडक कार्यवाही करुन सहा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचा धसका घेतल्याने जंपीगवाले कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले होते, आणि उर्वरित  कर्मचारी रडारवर होते.जिल्हाधिकारी म्हणून बढती झाल्याने त्यांच्या कार्यास ब्रेक लागला व जंपीगवाल्यांचे फावले, अशीही चर्चा मनपात कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळते.जे कार्य निमा अरोरा ह्या आयुक्त म्हणून न करू शकल्या नव्हत्या ती अपूर्ण कामे त्यांनी धडकपणे सुरू केल्याने यापुढे पुढील लक्ष कोणते याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतापूर्वक चर्चा सुरू आहे.  
यानंत जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कॉम्प्लेक्समधील पार्किंगच्या जागेवरील अतिक्रमण काढल्यास शहरातील वाहतुकीचा होणारा अडथळ्याचे प्रमाण कमी होईल‌.सध्या मोहंमद अली रोड वरील अतिक्रमणाच्या आक्रमक कारवाईबाबत  अकोला  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. या कारवाईत महानगरपालिका अतिक्रमण विभाग तसेच रामदास पेठ पोलीस स्टेशन सहभागी  होते.

    Post Views:  514


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व