विविध कार्यक्रमांनी साजरा झाला खेडकर नगरात श्रीकृष्ण जन्मोत्सव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Sep 2026, 8:32 AM
अकोला : स्थानिक खेडकर नगरातील श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला. दि. 4 रोजी रात्री 12 पर्यंत ह. भ. प. शिवहरी महाराज इस्तापे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी संपूर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाई व हारा फुलांनी सजविण्यात आले होते.
या जन्मोत्सवानिमित्त दि. 29 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने भजन, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या महोत्सवात ह. भ. प. संतोष महाराज पिसे यांचा विठ्ठल नाम जप कार्यक्रम याशिवाय डॉ. प्रकाश वानखडे, घनश्याम सावजी, अशोकराव सकळकळे, मुरकर महाराज, यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अखेरच्या दिवशी ह. भ. प. नंदकिशोर महाराज ढेंगे यांच्या काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादानंतर महोत्सवाची सांगता झाली. या महोत्सवादरम्यान विविध महिला भगिनी मंडळांचेही भजन, कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झालेत. डॉ. हेमंत मोरे यांचे हस्ते श्रीकृष्ण अभिषेक व महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जायले पाटील, उपाध्यक्ष दिनकर सुरसे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव जायले, सचिव दत्तात्रय लांडे, व्यवस्थापक सुधाकर गाडगे, सदस्य बाबाराव लोडम, श्रीकांत देशमुख, ओम प्रकाश पाडिया, शितूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास प्रदीप खाडे, केशव आढाऊ, अनंत झांबरे, दिलीप देशमुख, सुधाकर अंबुसकर, ऍड.अक्षय खाडे, विनोद लढे, ऍड. सुधीर गाडगे, आशय खाडे, निरंजन गव्हाळे, विजयराव उमरीकर, राहुल जायले, गौरव गव्हाळे, भूषण अंबुसकर, हर्षवर्धन भिसे यांचे सह प्रतिभा खाडे, सुशीला जायले, पल्लवी खाडे, आशाताई गव्हाळे, ज्योतीताई उमरीकर, साक्षी खाडे, शुभांगी देशमुख, सरला ताई लढे, स्मिता आढाऊ, संगीता झांबरे अपर्णा भिसे व परिसरातील नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
Post Views: 4