गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Sep 2026, 8:49 AM
   

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त माळवी सुवर्णकार महिला मंडळातर्फे वृक्षारोपण करण्यात आले समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कौतुक सोहळा तसेच समाजातील जेष्ठ नागरिक व यावर्षी सेवानिवृत्त झालेल्याचा सत्कार सोहळा घेण्यात आला. हे कार्यक्रम श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सेवा समिती गुडधी उमरी येथे 23/8/2026 ला दुपारी 3 ते  6 या वेळेत आनंदात संपन्न झाले. या कार्यक्रमाची प्रेरकवक्ता श्री गुरुवर्य जीवनराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायक मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रजनीताई उज्जैनकर व मनीषाताई अनासाने यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिता ताई शेरेकर यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते जेष्ठ व सेवानिवृत्त यांना शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र,गिफ्ट, मेडल देऊन कौतुक करण्यात आले.माळवी सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ माधुरीताई सोनी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या ...

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व