पुणे : भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे अण्णा यांच्या सहधर्मचारिणी आनंदीबाई तथा बाया कर्वे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल तर्फे वृक्षारोपण मुख्याध्यापक विष्णू मोरे, मुख्याध्यापिका कल्पना वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक योगेश्वर चव्हाण, सुभाष कांबळे, परेश इंदापूरकर, माधुरी कऱ्हाडे, अपूर्वा आदलिंगे, दीपक आगवणे, मंदाकिनी काशिद उपस्थित होते. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वांमध्ये जबाबदारीची जाणीव व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
Post Views: 228