१४ मे रोजी छावा संघटने तर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी करणार
पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मागदर्शन सभा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
26 Apr 2023, 8:37 AM
अकोला- येत्या १४ मे २०२३ रोजी छावा संघटने तर्फे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती मोठ्या जल्लोषात व भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळ्याची पूर्व तयारी व रूपरेषा ठरविण्या करिता सूर्यवंशम ढाबा येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मार्गदर्शन सभा संपन्न झाली. संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
छावा चे जिल्हा प्रमुख डाॅ. शंकरराव वाकोडे यांनी आयोजित केलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक मोरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय सरोदे, विजय मालोकार,अरविंद कपले,रीतेश खुमकर, शाम कुलट, रजनीश ठाकरे, निवृत्ती वानखडे, पवार साहेब उपस्थित होते.
मागील २ वर्षा पासून कोरोना मुळे हा जयंती सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. परंतु या वर्षी पासून पुन्हा अतिशय भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या तयारी करीता संपूर्ण जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामास लागले आहेत. १४ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी पार्क येथून जयंतीच्या शोभा यात्रेस प्रारंभ होईल. हजारो युवक सहभागी असलेल्या या भव्य शोभा यात्रेस ढोल, ताशे,नगाऱ्या सह विविध आखाड्यांची चित्तथरारक प्रात्याक्षिके, लेझीम सह विविध प्रकारची नृत्ये, भजनी मंडळे, विविध देखावे, धार्मिक दृष्ये आदिंचा सहभाग रहिल. अशी माहिती या प्रसंगी जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे यांनी दिली.
डॉ. दीपक मोरे, विजय मलोकर, डॉ. संजय सरोदे, निवृत्ती वानखडे यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले.
या सभेत काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्याम कोल्हे,प्रवीण बानेरकर,परिक्षीत बोचे,ज्ञानु मानकर,योगेश गोतमारे,पंकज कौलखेडे,गणेश इंगळे,योगीराज ससाणे,पुरुषोत्तम माघाडे,सोनू गिरी,निखिल श्रीनगर,अमोल हिंगणे,नितीन चव्हाण,बबलू पाटील मांगटे,चेतन लोखंडे,संदिप कुलट,अनिरुद्ध भाजीपाले,बबलू वसू,गजानन भारती,दिपक बिहाडे,सचिन माकोडे,विजय कुलट,सूरज कावळे,अजय भाऊ उपस्थित होते.
Post Views: 67