भरत सकपाळ राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!
कोल्हापूरात राज्य गुणवंत कामगार असोसिएशनकडून पुरस्कार वितरण
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2026-07-17
मुंबई (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कोयनेचे सुपुत्र,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद, मु़ंबईतील गोरेगांव येथील श्री भरत हरिबा सकपाळ यांना कोल्हापूर मध्ये राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त वैद्यमाने शाहू महाराज भवन कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला.
विविध सामाजिक, सहकार.कला सांस्कृतिक,कामगार क्षेत्र इतर सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि माजी गृहराज्यमंत्री पालकमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरेशजी केसरकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेचे सुपुत्र,वेंगळे राज्य गुणवंत कामगार पुरस्कार विजेते (महाराष्ट्र शासन) श्री भरत हरिबा सकपाळ यांना राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत,सखाराम जाधव,अनिल महाणे,ज्येष्ठ सहकार तज्ञ डॉक्टर प्रभाकर कांबळे, केरबा डावरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गुणवंत कामगार भरत सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपल्या मनोगतातून अष्टपैलू समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते असे सांगून पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.
भरत सकपाळ यांचा सामाजिक कामगार क्षेत्रातील कामगारांचे प्रश्नांसाठी लढा,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण,कोविड काळातील आदिवासी वंचित गरजू विद्यार्थ्यांना मदती तसेच गावाकडील शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच आई वृद्धाश्रम जयसिंगपूर येथील आजी आजोबांना वृद्धाश्रमातील मदती तथा सामाजिक व पत्रकारितेतील त्यांच्या योग्य दानाची दखल घेऊन त्यांस राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यापूर्वीही त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.त्यामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागल्याने त्यांच्या वेंगळे गावचे नाव उज्वल झाले आहे. त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल सर्व क्षेत्रामधून आणि विभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्कृष्टरित्या पार पडले. संस्थेच्या सचिव अनिता काळे यांनी उपस्थित मान्यवर पुरस्कारार्थी व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 17