तिसरे राज्यस्तरीय वर्हाड लोककला संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश चंदनशिवे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
31 Oct 2022, 5:23 PM
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रस्तुत वर्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी व मराठी विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि0 23/11/2022 रोजी तिसरे राज्यस्तरीय वर्हाड लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ0 गणेश चंदनशिवे यांची निवड करण्यात आली आहे. चंदनशिवे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत असून चंदनशिवे यांनी विपुल अभिनय केला असून, अनेक मराठी, हिंदी नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे. महाराष्ट्र शासन, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी मानद तमाशा लोकनाट्य कार्यशाळा घेतल्या आहेत. तमाशा विषयात पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले असून मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
संमेलनामध्ये उद्घाटन (सकाळी 10 ते 11.30), बोलीभाषा, लोककला व लोकसंस्कृती या विषयावर परिसंवाद (11.30 ते 12.30) यानंतर विदर्भातील विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बंजारा होळी नृत्य. खंजिरी भजन, गोंधळ, भारूड, राम ढोलाचे भजन, मथुरा लभाण लोकनृत्य व चंदनशिवे ह्यांची लोककला सादर होणार आहे. डॉ0 केशव सखाराम देशमुख ह्यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम होणार आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ0 रवींद्र शोभणे, श्री0 पुष्पराज गावंडे यांचे मार्गदर्शन ह्या संमलनाला लाभणार आहे.
ह्या संमेलनाचे मुख्य आकर्षण डॉ0 गणेश चंदनशिवे ह्यांचे लोककलेत तरुणांना संधी, चंदनशिवे ह्यांची दुसर्या सदरात सादर होणारी लोककला व मथुरा लभाण लोकनृत्य असल्याची माहिती वर्हाड संस्थेचे अध्यक्ष डॉ0 रावसाहेब काळे ह्यांनी दिली आहे.
संमेलनाचे नाव ः- तिसरे राज्यस्तरीय वर्हाड लोककला साहित्य संमेलन, अकोला.
स्थळ ः- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला.
दिनांक ः- 23/11/2022, वेळ ः- एक दिवशीय
Post Views: 201