राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांत स्वस्तिक कॅम्प्युटर टायपिंगच्या 9 विद्यार्थ्यांची निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Dec 2024, 10:16 AM
अकोला - दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक स्वस्तिक कॅम्प्युटर व शॉर्टहॅन्ड इन्स्टिटयूट,सन्मित्र कॉम्प्लेक्स पत्रकार कॉलनी अकोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. संस्थेच्या तब्बल 9 विद्यार्थ्यांची अनुक्रमे अकोला, ठाणे, नाशिक व अमरावती येथे जिल्हा व सत्र न्यायालय लिपिक पदी निवड झाली आहे. त्यामध्ये प्रकाश काळे , विठ्ठल वानखडे, गणेश जायले, शुभम पाली, कांचन अनासने यांची ची अकोला न्यायालय तर कु. पुनम बंड व कु गायत्री घाटे यांची ठाणे जिल्हा न्यायालय, तसेच नाशिक जिल्हा न्यायालय येथे योगेश इराचे यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर दरवेळेस प्रमाणे यंदाही टायपिंग व शॉर्टहॅन्ड परिक्षेत संस्थेच्या विद्यार्थांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्यामध्ये GCC-TBC Eng -30 मध्ये कीर्ती गुप्ता हिनी 95%, तर स्नेहा घोगरे व स्नेहा वानखडे ह्यांनी 94%, GCC-TBC Mar -30 मध्ये ओम निकामे व वैष्णवी करसकार ह्यांनी 95% तर शॉर्टहॅन्ड Mar-80 मध्ये राधीका शेळके हिने 84%, यश पाली 72%, व अर्पित निकामे ह्यांनी उत्तिर्ण श्रेणी गाठली आहे. हया सर्व विद्यार्थ्यांचा थाटात सत्कार समारोह पार पडला...
प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री. महादेवराव भुईभार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अ. नि. स. चे बबनराव कानकीरड उपस्थित होते, त्याचबरोबर श्री.श्रीकृष्ण माळी, युवा उद्योजक आदरणीय श्री. विठ्ठलराव गाडे, पत्रकार आदरणीय श्री. प्रमोद मुरूमकार, संपादक श्री. सतीश देशमुख,स्वस्तिक कम्प्युटर टायपिंग संस्थेचे प्राचार्य रविंद्र देशमुख, संचालिका सौ. ज्योती देशमुख, संचालक शंतनू देशमुख ह्यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे भरभरून कौतुक केले. मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका सौ. ज्योती देशमुख, सूत्रसंचालन प्राची देशमुख तर आभार प्रदर्शन कु.पुनम बंड ह्यांनी केले.
Post Views: 5