लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे बँकर्सना निर्देश
 संजय देशमुख  2024-03-18
   

अकोला, दि. 18 : लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी बँकांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून तत्काळ माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बँकर्सची बैठक नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, आचारसंहिता कालावधीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. निवडणूक काळात बँकांना रोज संशयास्पद व्यवहार अहवाल (एसटीआर) सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत. बँकांमार्फत असे व्यवहार होत आहेत किंवा कसे, एखाद्या शाखेत अचानक पैशाची मागणी वाढल्यास त्यावर नजर ठेवावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व आदेशांबाबत यापूर्वीही बँकांना माहिती देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघात कुठेही पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले. सर्व बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 

    Post Views:  190


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व