लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुंबई-कोकण सभा संपन्न
देशातील शहिद जवान, महिला,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,व आपत्ती बळींना श्रध्दांजली...संघटनेला सशक्त करण्य
पदाधिकारी नियुक्तीपत्र व सभासद ओळखपत्रांचे वितरण
पालघर --पत्रकारांनी स्वतःच्या आणि समाजाच्याही समस्या निर्मूलनासाठी लेखणीने सज्ज राहून सामाजिक न्याय आणि पत्रकार हक्कप्राप्ती संघटनेला सशक्त करण्यासाठी निरंतर संघटन कार्य करीत राहिलं पाहिजे.आपसातील हेवेदावे,चढाओढ,भेदभाव विसरून अन्यायाविरूद्ध संघर्षासाठी आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आपसातील एकोप्याचे बळ नेहमी वाढवत राहिलं पाहिजे असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी अंधेरी, मुंबई येथील सभेत केले. याप्रसंगी त्यांनी संघटनेच्या मागण्यांना मिळालेले यश आणि आगामी राष्ट्रीय अधिवेशन,स्मरणिका आणि दिनदर्शिका प्रकाशनाची माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना आगामी दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्यात.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई आणि कोकणातील पदाधिकारी व सभासदांचा तृतिय मासिक विचारमंथन मेळावा अंधेरी पश्चिममधील बैठक कॕफे येथे संपन्न झाला.त्यावेळी ते अध्यक्षिय भाषणातून बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघटनेचे मुंबईतील राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, दिलीपजी रूद्राक्ष महाराष्ट्र संघटन-संपर्क प्रमुख अरविंदराव देशमुख,ठाण्यातील जिल्हा संघटन,संपर्क प्रमुख संजयजी सोळंके, व आयोजनप्रमुख अंधेरी पदाधिकारी राजीव विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीपजी रूद्राक्षे व अरविंदराव देशमुख यांनीही मनोगते व्यक्त केली.
सर्वप्रथम लोक स्वातंत्र्याच्या सामाजिक वाटचालीचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना वंदन- अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,लैंगिक अत्त्याचारांत बळी गेलेल्या भगिनी,आत्महत्याग्रस्त अन्नदाते शेतकरी तथा नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातातील बळींना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ठाणे जिल्हा संघटन- संपर्क प्रमुख म्हणून संजय सोळंके यांची तर अंधेरी उत्तर -पश्चिमच्या संघटन-संपर्क प्रमुख पदावर राजीव विश्वकर्मा यांच्या नियुक्तीची संजय देशमुख यांनी घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्रे व त्यांचेसह ईतर नव्या सभासदांना ओळखपत्रे यावेळी प्रदान करण्यात आली. सर्व सभासदांनी संघटनेला सशक्त करण्यासाठी निरंतर सक्रियतेची ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी पालघर जिल्हाध्यक्ष जगदिशप्रसाद करोतिया, जिल्हा सचिव संतोष घरत,सुशांत संखे,स्वप्निल पिंपळे,(पालघर)उमेश चौधरी,प्रशांत लिंबाचिया,नरेश फूरिया, (अंधेरी) खंडू खोसे पाटील (अहमदनगर), प्रशांत शिंदे,गोपी पाटील, शैलेश मिश्रा (ठाणे) व ईतर सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन उमेश चौधरी यांनी केले.
==========================
Post Views: 16