महाराष्ट्र राज्य नागरी हक्क संरक्षण विभाग अमरावती परीक्षेत्र च्या वतीने कार्य शाळेचे आयोजन
अकोल्यातून डॉ मिलिंद पवार यांची उपस्थिती
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Jul 2026, 9:49 AM
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक )अधिनियम (989सुधारित अधिनियम 2015 व सुधारित अधिनिय2016 व इतर कायदा संबंधित कार्य शाळेचे आयोजन पोलीस अधिक्षक कार्यालय नागरी हक्क संरक्षण विभाग अमरावती परीक्षेत्र येथील अमरावती ग्रामीण मुख्यालयातील मंथन हॉल येथे दि 16 /7/26 गुरुवार रोजी पार पडले.
या मधे नागरी हक्क संरक्षण विभागाचा परिचय व कार्य पद्धती तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंध अधिनियम 1989(सुधारणा 2015 व 2018) नागरी हक्क सरक्षण विभागाचे घटक पातळी वर चालणारे कामकाज व ते करताना राहणाऱ्या त्रुटी, नियमांची अंमल बजावणी, सत्यता पडताळणी करतांना पोलीस प्रशासन आणि न्यायालयाची भुमिका या विषयावर मार्गदर्शन हा पण आजच्या कार्य शाळेतील महत्वाचा विषय होता.
तसेच महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित नेमक्या जाती व त्याचा समावेश त्याची मार्गदर्षक पुस्तिका पण देण्यात आली. हीं पुस्तिका अनिता जमादार (म. पो.से ) पोलीस अधिक्षक
ना. ह. स. छ. संभाजी नगर,परीक्षेत्र अति कार्यभर ना. ह. स. अमरावती परीक्षेत्र अमरावती यांनी प्रकाशित केली आहें.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वयत्त संस्था ) यांच्या वतीने आनुसूचित जाती जमाती सह इतर मागास वर्गीय व त्या व्यतिरिक्त हीं इतर कोणत्याही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थना समाजातील शिक्षण घेण्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक सवलती आणि त्याचा लाभ कोणकोणत्या क्षेत्रात विद्यार्थनी कसा घ्यावा व आज पर्यंत घेतला,जागरूक नागरिकांनी तशा गरजवंत विद्यार्थना कसे मार्गदर्शन करावे या वर मंथन आणि मार्गदर्शन झाले.
या कार्य शाळेत
मार्गदर्शक म्हणुन *आश्वती बोर्जे * भा पो से.
प्रमुख उपस्थिती श्री महेश पाटील भा. पो. से.
मार्गदर्शक वक्ते श्री सदानंद मानकर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
तसेच बार्टी च्या जिल्हा प्रकल्प अधिकारी अमरावती विभाग प्रमुख अनिता गवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्य शाळेला विभागीय पोलीस परीक्षेत्र अमरावती विभागातील शांतता समिती सदयांना आमंत्रित करण्यात आले होते. अकोल्यातून जिल्हा पोलीस शांतता समिती सदस्य खदान पो स्टे. यातून डॉ मिलिंद पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post Views: 5