बांधकाम कामगारांकरिता तपासणी ते उपचार या योजनेअंतर्गत फिरते वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-06-28
   

अकोला : बुधवार २६ जून रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व मंडळ नियुक्त लाइफीनिटी हिंदलॅब या कंपनीमार्फत अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांकरीता तपासणी ते उपचार या योजनेचा श्री नितीन पाटणकर कामगार उप आयुक्त, अमरावती  यांच्या निर्देशनात श्री राहुल काळे सहायक कामगार आयुक्त,अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इमारत बांधकाम मंडळ अकोला चे नोंदणी अधिकारी श्री विनोद जोशी, किरण राठोड व योगिता मालोकार यांच्या                उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त फिरते वैद्यकीय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन) कार्यरत करण्यात आली.  या योजनेत बाधकाम कामगार व त्याच्या कुटूंबातील पती  पत्नी व १० वर्षावरील प्रथम दोन आपत्य लाभार्थी राहणार आहेत. बाधकाम कामगार हा नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदाच योजनेच्या लाभासाठी पात्र राहिल. नोंदीत बांधकाम कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी केल्यानंतर कामगाराच्या जिवीतास धोका निर्माण करणारा असेल तर त्या आजारावर आवश्यक ते उपचार तपासणी ते उपचार या योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. या कार्यक्रनासाठी  कार्यालयीन कर्मचारी, डॉ. राधिका चांडक, हिंदलॅब . तंत्रज्ञ कु.किरण वाकोडे , कांचन मंग्ताने व डॉ , चंचल मजुमदार, अक्षय सरकटे यांची उपस्थिती होती.

    Post Views:  136


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व