स्व. डॅडी देशमुख यांची एकोणीसावी पुण्यतिथी रविवार, २१ जुलै रोजी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  18 Jul 2024, 11:44 AM
   

अकोला : स्व. बाबूराव साहेबराव उपाख्य डॅडी देशमुख हे अवघ्या महाराष्ट्राला देवकीनंदन गोपाला या परिवर्तनशील विचारांचा पुरस्कार करणाऱ्या संत गाडगे बाबा यांच्या जीवन व कार्यावरील कलात्मक चित्रपटाचे निर्माते म्हणुन सुपरिचित आहेत. स्व. पंजाबराव देशमुखांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा डॅडींनी समर्थपणे चालवला. अर्थशास्त्राचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन त्यांनी लक्षणीय असे योगदान दिले. त्यांच्या या पैलूचे स्मरण म्हणून आणि कृतज्ञता म्हणून आपण त्यांचे २१ जुलै रोजी दरवर्षी एका उपक्रमाद्वारे स्मरण करतो. त्या प्रमाणे या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दि. रविवार, २१ जुलै २०२४ रोजी सायं. ४ वा.वसंत ैसभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, शिवाजी पार्क, अकोला येथे अमरावती विद्यापिठातील, पदव्युत्तर परीक्षेत, अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॅडींच्या नावे सुवर्णपदक आणि रोख रक्कम देऊन गौरव . व महाराष्ट्रातील नामवंत वक्त्ये  सन्माननिय  मा. प्राचार्य प्रो. डॉ. के. के. पाटील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, ता. परळी (वैजनाथ), जि. बीड यांचे भारताचे शेती क्षेत्र : "धोरणे व आव्हाने" ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन. तसेच डॅडींनी स्थापन केलेल्या ललित कला अकादमी तर्फे आयोजित "रंग भरो स्पर्धा" मधील विजयी कलाकारांना पुरस्कार चे आयोजन. करण्यात आले आहे  तरी सर्व रसिक, अभ्यासू आणि डॅडींच्या चाहत्यांनी जरुर यावे असे आवाहन प्रा. सुरेश गं. राऊत अध्यक्ष ललित कला अकादमी अध्यक्ष डॉ. अंबादासजी कुलट प्रा. श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला अनुराग मिश्र सचिव महादेवराव भुईभार व समस्त कार्यकारिणी सदस्य, बाबूजी देशमुख वाचनालय, अकोला आणि ललित कला अकादमी, अकोला यांनी केले आहे

    Post Views:  91


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व