जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आलोक तेरानिया, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी संध्या करवा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, एचडीएफसी इर्गो कपंनीचे जिल्हा समन्वयक रुपेश दिक्षीत, दिलीप सेन, सुनिल भालेराव, तालुका अधिक्षक शंशीकिरण जांभरुणकर, नंदकुमार माने आदि उपस्थित होते.

 ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवा ही स्वयंचलित प्रोग्राम व चॅटबॉट आहे. जो पुर्णत: डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासेवेव्दारे पिक विमासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्या व्यक्तीला ऑनलाईन व्हाट्सअप बॉटव्दारे मेसेज करुन दिल्या जाते.  ही माहिती मिळवण्याकरीता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये 7304524888 नंबर सेव्ह करून या नंबरवर व्हाट्सअव्दारे  हाय(HI) टेक्स्ट मॅसेज पाठवून पिक विमा योजनेबाबतची माहिती तसेच प्रश्नाचे उत्तरे व पीक विमा योजनेत सहभाग नोंदवल्याबाबतची माहिती पिहु व्हाट्सअप बॉट सेवेव्दारे उपलब्ध होईल.

‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे फायदे :

1)    प्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर पिक विमा अर्जाची स्थितीबाबत माहिती उपलब्ध होईल.

2)   विमा योजनेबद्दल विविध प्रकारचे विचारले जाणारे प्रश्नाचे त्तर यामध्ये मिळेल. उदा. प्रधानमंत्री पीक विमा म्हणजे काय?,  नुकसान भरपाई कशा प्रकारे निश्चित केली जाते?, कोणत्या जोखीम बाबीचा व पिकाचा समावेश आहे?, इत्यादी.

3)   शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार देण्याकरिता माध्यम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

4)  योजनेत सहभाग नोंदवला आहे त्याबद्दलची संपूर्ण धोरण पॉलिसीची माहिती मिळेल.

5)  शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार दिल्यानंतर सर्वेक्षणाची(पंचनामा) स्थिती किंवा पीक नुकसान भरपाई, दावा, रक्कम स्थिती याव्दारे समजू शकेल.

6)   पीक विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कृषी व पशु संबंधित अन्य माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.