राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्यावतीने 28 जून रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रम


जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा जाहिर नागरी सत्कार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2026, 6:34 PM
   

कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून, राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार 28 जून रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापून येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या दोन्ही संस्थांच्यावतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 
सदर कार्यक्रम खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (खासदार, लोकसभा) नामदार प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर), नामदार हसन मुश्रीफ (वैद्यकिय शिक्षण मंत्री) यांची प्रमुख उपस्थितीत तर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (विधान परिषद, गटनेते) यांच्या अध्यक्षतेखाली व सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल म्हमाने तसेच राज्यातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
यावेळी रंगराव नाना सावंत यांनी समाजात व परिसरामध्ये कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत - उद्योग, समाजकारण, शिक्षण, साहित्य, विज्ञान, आरोग्य तसेच नैसर्गिक आपत्तीच्या थोडक्यात कोरोना व महापुराच्या काळात केलेली उल्लेखनीय आणि प्रेरणादायी निस्वार्थ सेवा आणि दूरदृष्टीतून समाजाला दिलेले योगदान खरोखरच अनमोल आहे. त्यांनी आजअखेर अनेकांना योग्य मार्गदर्शन, प्रबोधन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी विविध सेवाभावी संस्था तसेच स्वतःच्या पुढाकाराने समाजहित, जनकल्याण आणि मानवसेवा या उदात्त भावनेतून केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे आणि लोकाभिमुख सेवेमुळे समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाचा मान्यवरांच्या हस्ते जाहिर नागरी सत्कार संपन्न होणार आहे.
जे कार्यकर्ते आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या भावनेतून, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, संघटना अध्यात्मिक, आरोग्य, पत्रकारीता, उद्योग, कृषी, योगा, शासकिय व निम शासकीय सेवेत वैशिष्ठयपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात, अशा कार्यकर्त्यांना समाज भूषण, समाज रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, . उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता आदि. पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे -
प्रभाकर कांबळे - कोल्हापूर रत्न, केरबा डावरे - शाहू पुरस्कार, कल्पना भाईगडे - आदर्श माता, संजीव चिकुर्डेकर - शाहू पुरस्कार, काळूराम लांडगे - शाहू पुरस्कार, भरत सकपाळ - समाजरत्न, विठ्ठल नाईक - समाज भूषण, बालाजी सक्करगे - कामगार भूषण, विजय रणखांब - जीवन गौरव, राजकुमार किर्दत - कामगार भूषण, विनय पिंपरकर - साहित्यरत्न, रविंद्र पाटील - कामगार भूषण, किरण नामजोशी - आध्यात्मिक कला भूषण, दत्तात्रय दिवेकर - कृषी भूषण, पांडुरंग उर्फ सर्जेराव पाटील ठाणेकर - शाहू पुरस्कार, विलास निकम - योगरत्न जीवनगौरव पुरस्कार, दत्तात्रय जाधव - कामगार भूषण, उदय रोटे - आदर्श कामगार, एकनाथ कंदले - शाहू पुरस्कार, मनोज पवार - कृषी भूषण, अभिजीत बिडकर - उद्योग रत्न, संतोष नातू - कृषी भूषण, लीलावती पाटील - समाजरत्न, राम सारंग - समाजभूषण, संतोष शिंदे -  समाजभूषण, चंद्रकांत लव्हटे - उद्योगरत्न, अनंतराव घोगरे पाटील - शाहू पुरस्कार, पोपट देसाई - समाज रत्न, हिरालाल चौधरी - समाज भूषण, प्रदीप हसबे - आदर्श शिक्षक, पांडुरंग पाटील - आदर्श शिक्षक, राजेंद्र जाधव - समाजरत्न, अरुण सूरकर - समाजभूषण, अशोक मासाळे - समाजरत्न, गीता पवार - समाजभूषण, शामराव बोडके - उद्योग भूषण, राजेंद्रकुमार पाटील - समाजरत्न, वर्षा ढाले - आदर्श शिक्षिका आदी.
राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेले पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे -
विकास देसाई- लोक प्रशासन उत्कृष्ठता, रेवती जरग - समाजरत्न, भार्गवी कुलकर्णी - प्राणी मित्र, राहुल पाटील - कामगार रत्न, लता दुधाळे - कामगार रत्न, प्रज्ञा शिंदे - आदर्श परिचारिका, प्रदीप जाधव - कामगार भूषण, सुनील कुचेकर - शाहू पुरस्कार, शिवाजी दिंडे - समाजभूषण, गणेश भोसले - समाजभूषण, रमेश नाईक - महाराष्ट्र रत्न, संगीता चव्हाण - आदर्श समाजसेविका, शिवानी हिंगोणीकर - समाजभूषण, स्वाती दिवाण - आदर्श माता, नरहरी माळी - समाजभूषण,  राहुल राजापुरे - साहित्य भूषण, मेघा शिवगुंडे - आदर्श महावितरण अभियंता, विलास पाटील - अध्यात्मिक कला भूषण, विद्याधर राणे - कामगार भूषण, किशोर बिंद - सहकार भूषण, हर्षल बनसोड - शाहू पुरस्कार, पंडित निंबाळकर - समाजभूषण, चंद्रकांत पाटील - क्रीडारत्न, दीपक शिंगारे - सहकार रत्न, मनीषा सुतार - आदर्श शिक्षिका, प्रशांतकुमार शेरवेगार - सहकार भूषण, तुळसीदास सन्नके - कोल्हापूर भूषण, रेहाना मुल्ला - समाजरत्न, वसंत पाटील - कामगार व कवी भूषण, बाळकृष्ण तावडे - सहकार भूषण, राजीव सोनकांबळे - सहकार भूषण, वैशाली कांबळे - कामगार भूषण, उत्तम जगताप - आदर्श पत्रकार, आकाश शिंदे - कृषी भूषण, डॉ. योगेश शेळके - आदर्श धन्वंतरी, वर्षा माने - आदर्श परिचारिका, भरत खांडेकर - शाहू पुरस्कार आदी.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकत्यांनी व मान्यवरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी अनिता काळे, संजय सासने, संभाजी थोरात, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबे, गंगाधर म्हमाने आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व