कॉंग्रेसचे एक दिवसीय उपोषण...
संतोष घरत - (जिल्हा प्रतिनिधी)
पालघर ! युरिया खताचा काळाबाजार व आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना झालेली विषबाधा ह्या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई व्हावी म्हणून आज पालघर जिल्हा काँग्रेस ने जिल्हाधिकारी पालघर कार्याला समोर लाक्षणिक उपोषण केले आहे.
११ जुलै रोजी गंजाड मनिपुर येथे छापा टाकून पकडलेले युरिया खत, आणि ते खत जास्त दराने विकणारे युरिया माफिया व त्या युरिया माफीयांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध कारवाई न केल्यास अनेक संघटनाने आंदोलनाचे इशारे दिले. ते इशारे राहिले गुलदस्त्यातच....
शेतकऱ्यांचा हक्काचा युरिया खत औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दिवसाढवळ्या पोहचविणाऱ्या टोळीत वाढ झालेली असून युरिया खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना शासन प्रशासन लक्षच देत नसल्यामुळे पालघर जिल्हा कॉंग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
नेहमी प्रमाणे कृषी अधिकारी अहवालात फेरबदल करून दोषींना क्लीन चीट देत असून डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मणिपूर या ठिकाणी युरिया खताचा मोठा साठा सापडला होता. सदर ठिकाणी खत साठवणूक करण्यासाठी कुठलाही परवाना नसताना रंगेहाथ पकडण्यात आलेला युरिया साठवणूक करणाऱ्या माफियांविरोधात पोलीस प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी देखील सुरू करण्यात आली होती परंतु नोटांचा आवाजा पुढे चौकशी फार काळ टिकली नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
११ जुलै रोजी गंजाड मनिपुर येथे छापा टाकून पकडलेले युरिया खत, आणि ते खत जास्त दराने विकणारे युरिया माफिया व त्या युरिया माफीयांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध कारवाई न केल्यास अनेक संघटनाने आंदोलनाचे इशारे दिले. ते इशारे राहिले गुलदस्ताच...
पालघर जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना कांबळगाव येथील केंद्रीय मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून देण्यात आलेल्या अन्नामुळे विषबाधा झाली होती त्या विषबाधेत सुमारे ५०० पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनामार्फत जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडून आश्वासन देण्यात आले होते परंतु आजतागायत कुठली कारवाई न केल्यामुळे तसेच सदर स्वयंपाक गृहात शिजवला जाणारा अन्न स्थानिक पातळीवरून खरेदी करावा त्यामुळे अन्न धान्य हे ताजे मिळतील व स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होईल अशा विविध मागणीसाठी आज ४सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पालघर जिल्हा कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, सरचिटणीस मनोज दांडेकर,बळवंत गावित उपाध्यक्ष अनुसूचित जमाती सेल महाराष्ट्र प्रदेश, प्रवक्ता अविष राऊत ,सिकंदर शेख उपाध्यक्ष पालघर, राजेश अधिकारी पालघर तालुका अध्यक्ष, उदय संखे बोईसर विभाग अध्यक्ष व कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून शेती प्रगत जिल्हा आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया खत कमी दराने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात छुप्या पद्धतीने विक्री करत असताना कुठलाही परवाना नसताना गोदामात साठवणूक केलेला निमकोटेट युरियाला क्लीन चिट देणाऱ्या कृषी अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे तसेच आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना झालेली विषबाधा बाबत कारवाई देखील झाली पाहिजे.
प्रफुल्ल पाटील - पालघर जिल्हाध्यक्ष पालघर जिल्हा कॉंग्रेस कमेटी
Post Views: 160