पाटील समाज महिला मंडळाच्या कौटुंबिक समस्या समेट केंद्राचे उद्घाटन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
03 Jun 2026, 7:16 PM
अकोला........ पाटील समाज अकोला अंतर्गत पाटील समाज महिला मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या कौटुंबिक समस्या समेट केंद्राचे उद्घाटन विधीवत स्वरूपात संपन्न झाले. पाटील समाज महिला मंडळाच्या सचिव तथा या केंद्राच्या संचालिका ऍड. दिपाली जानोरकर यांच्या रतनलाल प्लॉट स्थित कार्यालयात तयार करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशिम च्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई गावंडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विधीज्ञ तथा बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष मोतीसिंग जी मोहता उपस्थित होते. मुंबई येथील प्रख्यात समाजसेविका मायाताई तळेकर, पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बहाकार, सचिव ऍड. दिपाली जानोरकर, पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे, समाजसेविका अनुसया ताई गोंडचवर विचार मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा चे पूजन व कार्यालयाची फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
उदघाटिका वैशालीताई गावंडे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, ज्या कुटुंबात चांगले संस्कार, आचार, विचार व समजूतदारपणा आहे त्या कुटुंबात सहसा कलह होत नाहीत. त्यासाठी पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींवर चांगले संस्कार करावेत व त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवावेत.
ऍड. मोतीसिंग जी मोहता
आपल्या मनोगतात म्हणाले की, समाजात समेट केंद्र अथवा वृद्धां श्रमांची गरजच पडू नये. कुटुंबातील समस्या चार भिंतीच्या आतच सोडविली तर कोर्ट कचेऱ्यां वरील बोजा तर कमी होईलच शिवाय अनेक अप्रिय घटनांना आळा बसेल.
अशोकराव अमानकर आपल्या मनोगतात म्हणाले की, इतिहासात होऊन गेलेल्या काही विरांगणांनी स्वराज्य बांधणीचे काम केले. आताच्या महिलांनी समाज बांधणीचे कार्य करावे. जेणेकरून एक सुसंस्कृत समाज घडविण्यास मदत होईल.
केंद्राच्या संचालिका ऍड. दिपाली जानोरकर यांनी प्रास्ताविक करून या केंद्र स्थापने मागील हेतू विशद केला. समाजसेविका मायाताई तळेकर, प्रदीप खाडे, मराठा समाज बाळापुर तालुक्याचे अध्यक्ष शरद वानखडे यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप खाडे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली बहाकार यांनी केले.
कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे, डॉ. संजय सरोदे, डॉ. सीमा तायडे, डॉ. किरण बहाकार, राजेंद्र मोहोकार, विनायकराव शेळके, गजाननराव इंगळे, विजय बोरकर, अशोक पटोकार, पंकज साबळे, पंकज जायले, प्रकाश डिवरे, दिनकर सरप, मनीष हिवराळे, डॉ. दिलीप मानकर, सुरेश पाटील दहातोंडे, मनीष खर्चे, रेखाताई राऊत, ज्योतीताई चोरे, ऍड. सविता खोटरे, ऍड. अनिल लव्हाळे, ऍड. श्रुती भट, ऍड. गोपाल आखरे, ऍड. स्नेहा लव्हाळे, श्रीमती अनुसयाताई गोंडचवर, अनिता पाटील दहातोंडे, नीलिमा मोहोकार, चैताली मोहोकार, मीनल गोंडचवर, उषाताई वानखडे, संगीता दाळू, राधा राऊत, वनमाला ठाकरे, दिपाली दांदळे, संगीता ताथोड, सविता आढाऊ, सुमित्रा काकड, स्वाती बारबदे, राधा ठोसर, स्वाती हिंगणकर, रेणूताई गावंडे, उज्वला फुंडकर, रेणुका राऊत, प्रभाताई बाळसराफ, पूजा चांडक, धनश्री टिकार, खुशबू परमार, भरत गोंडचवर, दिलीप राऊत, जय ठोसर, सोनोने, विलास गवई, खरे साहेब व इतरही गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Post Views: 1