शिंदे सरकारचे बहुमत सिद्ध; विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव


सत्ताधारी पक्षाला 167 तर मविआला 99 मते
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Jul 2022, 9:36 PM
   

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव 167 विरूध्द 99 अशा बहुमताने जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.समाजवादी पक्षाचे 2 तर एम आय एमचे एक सदस्य तटस्थ राहीले काँग्रेसच्या 5 मंत्र्यांची मतदानावेळी अनुपस्थिती होती.  
शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. 287 आमदारांपैकी 164 मते शिंदे सरकार मिळाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात 99 जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज 20 आमदार गैरहजर होते. दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषण करताना अनेकांनी टोलेबाजी केली.
महाराष्ट्र  विधानमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारपासून मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी  विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार व भरतशेट गोगावले यांनी नियम 23 अन्वये प्रस्ताव दाखल केला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करणारा हा प्रस्ताव होता. विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर मतविभागणी घेण्यात आली, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 मते मिळाल्याने त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे अध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. या प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 99 सदस्यांनी मतदान केले, तर 3 सदस्य तटस्थ राहिले.
काँग्रेसचे 10 आमदार गैरहजर
यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे. तर अण्णा बनसोडे, संग्राम जगताप, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, नवाब मलिक, अनिल देशमुख, मुफ्ती इस्माईल, निलेश लंके, दत्तात्रय भरणे, दिलीप मोहिते, माधवराव जवळगावकर हे गैरहजर होते.
शंभरीही गाठता आली नाही
रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावा विरोधात 107 मते पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले होते.
राजकारण देवेंद्र फडणवीसांचे
या राजकीय नाट्यात बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने यावेळीही बाजी मारत पुन्हा एकदा फडणवीसांच्या राजकारणाचे गडद चित्र दिसले. यावेळीही शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारत आपला गट मजबूत ठेवला आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे.

    Post Views:  366


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व