सन्मान देण्याचा मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो....अॕड अनंत खेळकर


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५७ वा मासिक विचारमंथन,सन्मान व ओळखपत्र वितरण मेळावा संपन्न
 विश्व प्रभात  28 May 2026, 2:58 PM
   

दोन आदर्श सरपंचांना "लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा गौरव तर  ३ महिलांना "लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार व ईतर सन्मान 

अकोला---ईतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो.या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून उल्लेखनिय कार्य घडून येत असते.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे कार्यक्रम म्हणजे "एल अँड टी"कंपनी,अर्थात लय टोले घेणाऱ्या टीमकडून होणारे उपक्रम वाटतात.असे मजेदार परंतू वास्तवतादर्शक प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी अॕड.अनंत खेळकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा अकोला येथील ५७ वा विचारमंथन,मार्गदर्शन,सन्मान समारंभ तथा स्नेहमिलन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षिय मनोगतातून ते बोलत होते.यावेळी रिधोरा येथील सरपंच राजाभाऊ देशमुख व आळंदा येथील सरपंच दत्ताजी ढोरे  हे प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
     लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,विदर्भ साहित्त्य संघाचे अकोला कार्याध्यक्ष डॉ.विनय दांदळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आदर्श सरपंच श्री राजाभाऊ देशमुख व दत्ताजी ढोरे  यांना "लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा गौरव तर कवितताई ढोरे,तुलंगा माजी सरपंच सौ.उज्वलाताई पाटील आणि अलकाताई देशमुख यांना "लोकस्वातंत्र्य विश्वशक्ती गौरव या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.तर निंबा येथील वसतीगृहाच्या माजी अधिक्षिका सौ‌.सुनंदाताई नराजे यांचा उत्कृष्ट सेवाकार्याबध्दल तथा अमरावती विद्यापीठ अभ्यासक्रमात कविता समाविष्ट झालेले साहित्त्यिक सुरेश पाचकवडे यांचा व डॉ.अशोक शिरसाट यांचा पुरस्कार बहूमानाबध्दल सन्मान करण्यात आला. 
     यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,महिला,शेतकरी व विविध बळींना श्रध्दांजली वाहण्यात आली.सभासद आय कार्ड वितरण करण्यात आले.अध्यक्ष संजय देशमुख यांनी पत्रकार, आणि सर्वसामान्न्य सभासदांच्या बळावर चालणारे उपक्रम,सतत लक्ष आणि  समाज व पत्रकार मागण्यांच्या  अविरत संघर्षाच्या वाटचालीने संघटना महाराष्ट्रात विस्तारत ६ राज्यात पोहचल्याची माहिती दिली.प्रा.डॉ‌.ममताताई इंगोले यांनी सुध्दा पुरस्कारासाठी रत्नांची पारख करणाऱ्या लोकस्वातंत्र्य यंत्रणेच्या शोधक नजरेचे कौतुक केले‌. 
   कडक उन्हातही भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या  कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख,पुष्पराज गावंडे,सिध्देश्वर देशमुख,गजाननराव देशमुख,बाजी वझे काका,अंबादास तल्हार,अॕड.राजेश जाधव,सौ.जया भारती,प्रा‌.डॉ.ममताताई इंगोले,सुरेशजी महल्ले, डॉ .शंकरराव सांगळे,डॉ.तेजराव नराजे,सौ.सुनंदाताई नराजे,राजाभाऊ देशमुख,विनायक पांडे,संतोष धरमकर,अॕड.संकेत देशमुख,प्रा.विजयराव काटे,प्रा.महादेव लूले,संदिप देशमुख,पंजाबराव वर,सागर लोडम,मनोहर मोहोड,सतिश देशमुख,दिलीप नवले,सौ.दिपाली बाहेकर,वसंतराव देशमुख,बुढन गाडेकर,संजय कृ.देशमुख,रमेश समुद्रे,आशिष वानखडे,विकास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
     याशिवाय जानकीराम वाकोडे,अविनाश भगत,देवीदास घोरळ,रविंद्र देशमुख,शिवचरण डोंगरे,गणेश मुळे,साहेबराव तायडे,श्रीकृष्ण माळी,कविताताई ढोरे,गजानन मुऱ्हे,नागोराव मोहोड, डॉ.मनोहर घुगे,कैलास टकोरे,अशोककुमार पंड्या,नितीन लोडम,मोहन ढोरे,एकनाथ पाखरे,नागोराव ढोरे,कृष्णा चव्हाण,फुलचंद वानखडे,अमित इंगळे,अजय वानखडे,संजय देऊळकार,अर्जूनराव घुगे,गजानन थोरात,आत्माराम शेळके,संजय दारोकार,चेतन ढोरे,अभिजीत तायडे,खुशाल तायडे,मंगेश गवई,प्रमोद चौधरी,खोमेश मसराम,रवींद्र इंगळे व अनेक सभासद व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती इंगोले तर आभारप्रदर्शन आशिष पाटील वानखडे यांनी केले.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व