पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Dec 2022, 8:44 AM
   

पालघर : (संतोष घरत )- पालघर जिल्ह्यातील (वसई तालुका वगळून ) हद्दीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 1951 चे कलम ३७(१) (३) अन्वये दि. 03डिसेंबर 2022 रोजी 00.01 वा. पासून ते दि.16डिसेंबर 2022 रोजी 24.00 वा. या कालावधीपर्यत मनाई आदेश लागू केले आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी पालघर डॉ. किरण महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार कलम ३७ (१) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कोणताही दाहक पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
शिवाय, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करणे , गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे,तसेच ज्यामुळे सभ्यता अगर नीतीमतेस   धक्का पोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल तसेच ज्यामध्ये राज्य उलथवुन टाकण्याची प्रवृति दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणे तसेच अशी चित्रे, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.अश्या बाबीसाठी मनाई आदेश करण्यात आला आहे.
कलम ३७(१) अंतर्गतचा हा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठाचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वांमुळेला लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे. तसेच लग्नकार्यासाठी जमलेले लोक, प्रेतयात्रा व अत्यंसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका यांना लागु असणार नाही.

    Post Views:  274


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व