प्रमोद अशोकराव अंभोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्काराने हैद्राबाद येथे सन्मानित


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 May 2026, 7:42 PM
   

परभणी (प्रतिनिधी) : समाजकारण, पत्रकारिता आणि विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे परभणी जिल्ह्याचे सुपुत्र प्रमोद अशोकराव अंभोरे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार – 2026 प्रदान करण्यात आला. हैद्राबाद (तेलंगणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा – 2026 कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समता साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य (रुग्णसेवा), पत्रकारिता, सांस्कृतिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रमोद अशोकराव अंभोरे यांना प्रदान करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.
प्रमोद अशोकराव अंभोरे हे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणीचे सचिव, वंचित बहुजन आघाडी परभणी तालुकाध्यक्ष, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष आणि बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ‘समाजहित न्यूज’ आणि ‘सा. बंड’ वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही ते सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. या पुरस्कार सोहळ्यात कर्नल व्ही. के. पोकरियाल, पद्मश्री अशोककुमार हलदर, प्रो. डॉ. माया देवी, समता साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एस. तांडेकर आणि राज्य उपाध्यक्ष डॉ. विजय कुलदीपके यांच्या हस्ते प्रमोद अशोकराव अंभोरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल परभणी जिल्ह्यासह विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातून प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व