महाराष्ट्र राज्य पदवीधर संघर्ष संघटनेची अधिकृत घोषणा व पत्रकार परिषद संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-01-09
अकोला : शहरालगत असलेल्या मलकापूर येवता रोडवरील श्रीमती देवकाबाई (माई) देशमुख प्राथमिक शाळेमध्ये रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ११-३० वाजता महाराष्ट्र राज्य पदवीधर संघर्ष संघटनेची मान्यवरांच्या तसेच विविध वृत्तपत्रांच्या आलेल्या पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. श्री विजय दुतोंंडे यांच्या अध्यक्षतेखाली अराजकीय संघटनेची स्थापना करण्यात आली यावेळी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना डाॅ. विजय दुतोंडे यांनी समर्पक उत्तरे देत ही संघटना कुण्याही पक्षाशी बांधील नसून स्वतंत्र विचारसरणीची असल्याचे तसेच ही संघटना फक्त पदवीधर बंधु आणी भगिनींच्या समस्या सोडविण्याकरिता कायम झटणार असल्याचे तसेच या संघटनेचे कार्य हे येत्या तीन महिन्यात सर्वांच्या दृष्टीक्षेपात येईल असे बोलून दाखविले. या कार्यक्रमाला बऱ्याच संघटनांचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी, अकोला शहरातील पत्रकार मंडळी तसेच प्रतिष्ठीत नागरिक व शाळेमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज योगायोगाने डाॅ. विजय दुतोंडे यांचा वाढदिवस असल्याने संघटनेच्या स्थापनेनंतर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षका आणी इतरांनी मोठ्या उत्साहात वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी असंख्य चाहत्यानी डाॅ. विजय दुतोंडे यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या तसेच संघटन वाढीकरिता मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Post Views: 226