डवले कॉलेजच्या साई इंगळे याचा मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सत्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Aug 2025, 9:50 AM
साई शुभांगी संतोष इंगळे हा डवले कॉलेज अकोला चा विद्यार्थी असून विज्ञान शाखेतून २०२५ परीक्षा बोर्डातून तो प्रथम आला. तसेच
JEE ॲडव्हान्स मध्ये तो ओबीसी प्रवर्गातून 506 गुण घेऊन अकोला जिल्ह्यातून देखील प्रथम येण्याचा त्याने बहुमान पटकावला आहे. तो आकाश इन्स्टिट्यूट मध्ये कोचिंग घेत होता. त्याच्या घवघवीत यशाबद्दल त्याचा सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी ( रस्ते परिवहन व महामार्ग निर्माण मंत्री भारत सरकार ) यांच्या हस्ते संपन्न झाला त्यांनी त्याच्या यशाचे कौतुक देखील केले. पुढील शिक्षणासाठी आयआयटी मुंबई येथे प्रवेश घेतलाआहे.डवलेकॉलेज साठीहीखरोखरचअभिमानाची बाब आहे.
तो त्याच्या यशाची श्रेय त्याचे परिश्रम, आई वडील, शिक्षक, गुरुजन, कॉलेजकडून वेळोवेळी होणारे मार्गदर्शन यांना देतो. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य प्रकाश डवले सर, संचालिका सौ मृणालिनी डवले मॅडम, प्रा कविता बलिंगे , प्रा प्राची घिनमिणे , प्रा वैशाली निवाने,प्रा श्वेता तायडे, प्रा वररुची खेडकर, प्रा दिपाली चिकटे,प्रा.स्वाती बोरोडे, प्रा श्रद्धा देशपांडे, प्रा रजनी पांडे य, प्रा इतिका दुबे, प्रा पारिजात पुनसे, सागर लोखंडे, श्याम सुलताने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी साई इंगळे चे अभिनंदन तसेच कौतुक केले.
Post Views: 264