ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा बुलढाणा दौरा


रत्नाकर वानखडे यांचा सेवापूर्ती सत्कार डी.एफ.निंबाळकर, राज्य जनरल सेक्रेटरी सैनिक फेडरेशन
  विश्वप्रभात  19 Mar 2026, 10:23 AM
   

खामगाव--    सैनिक फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष  *माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत* हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात माजी सैनिक, सैनिक परिवार आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता‌ . खामगाव येथील सैनिक संमेलन
दौऱ्यात सैनिक फेडरेशन बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री. रामराव देशमुख* यांच्या निवासस्थानी  सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद साधून त्यांच्या  समस्या जाणून सूचना समजून घेतल्या.

 
      याप्रसंगी सैनिक फेडरेशनची जिल्हा टीम सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी श्री. रत्नाकर वानखडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात सहभागी झाली. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक व सैनिक परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी *वराडी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.*
सत्कार सोहळ्यात बोलतांना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रत्नाकर वानखडे आणि त्यांच्या परिवाराने शहर व समाजासाठी केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच येत्या काळातही ते आपल्या गावासाठी आणि सैनिक समाजासाठी असेच कार्य करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी पत्रकारांशी बोलताना ब्रिगेडियर सावंत यांनी देश व जगात घडणाऱ्या घटनांवर भाष्य करताना स्पष्ट संदेश दिला की, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. शांतता, विकास आणि मानवी मूल्यांचा संदेश देणारा हा विचार त्यांनी मांडला.

यानंतर त्यांनी जिल्हा टीमसह चिखली व बुलढाणा येथील  येथे शहीद स्मारकाला भेटी दिल्या.याठीकाणी  शहीद स्मारकाला अभिवादन व देशासाठी बलिदान दिलेल्या अमर जवानांना अभिवादन करण्यात आले.सैनिक किसान अर्बन बँक संचालक मंडळाची भेट घेण्यात आली.
 *बुलढाणा येथे ECHS (Ex-Servicemen Contributory Health Scheme) चे OIC कर्नल जतकर* यांची भेट घेऊन सैनिकांच्या आरोग्यविषयक सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
    शेवटच्या टप्प्यात मलकापूर येथे सैनिक  संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनात *तालुका अध्यक्ष श्री. नामदेवराव राजपूत, कॅप्टन  झणके साहेब* व त्यांच्या संपूर्ण टीमनचा उत्कृष्ट सहभाग होता.
     मलकापूर तालुक्यात सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सैनिक फेडरेशनकडून विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जात असल्याबद्दल सर्वांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
    या कार्यक्रमाला *नगरसेवक अशांतभाई वानखेडे (सभापती  शिक्षण विभाग)* हेही आवर्जून उपस्थित होते. त्यांनी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी त्यांच्या पाठीशी राहण्याचे  तथा मलकापूर तालुक्यात सैनिक भवन आणि शहीद स्मारक उभारण्यासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
      दौऱ्याच्या समारोपप्रसंगी *ब्रिगेडियर सुधीर सावंत* यांनी प्रत्येक जिल्ह्याने सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील कार्यक्रमांचे नियोजन करून ते प्रभावीपणे राबवावेत व अशा उपक्रमांद्वारे सैनिक व सैनिक परिवारांना एकत्र आणण्याचे आवाहन केले.देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान, त्यांच्या समस्या सोडविणे आणि समाजात देशभक्तीची भावना दृढ करणे हेच सैनिक फेडरेशनचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले.             
                       *डी. एफ. निंबाळकर*
जनरल सेक्रेटरी
सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य

    Post Views:  28


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व