९ ऑक्टोबर - विश्व डाक दिवसा निमित्त विशेष.


 संजय देशमुख  2023-10-08
   


  • स्वतंत्र्य भारताचे पहिले डाक तिकीट २१ नोव्हेंबर १९४७ रोजी.
  • आज पर्यंत ३ हजारापेक्षाही. जास्त तिकिटांची निर्मिती. 
  • अक्षय खाडे यांच्या संग्रहात हजारो डाक तिकीटांचा समावेश

अकोला

९ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात विश्व डाक दिवस म्हणून साजरा केल्या जातो. ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंड मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनीयन स्थापण करण्यान आली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी स्वित्झर्लंड हा देश ९ ऑक्टोबर रोजी डाक दिवस साजरा करीत असे. त्यानंतर १९६९ पासून संपूर्ण जगात हा दिवस साजरा केल्या जाऊ लागला अशी माहिती आजच्या ङाक दिवसानिमित्त प्रख्यात जागतिक चलन व नाणे तसेच तिकीट संग्राहक अक्षय प्रदीप खाडे यांनी दिली आहे.
जगात ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर हा कालावधी डाक सप्ताह म्हणुन साजरा केल्या जातो. 



९ ऑक्टोबर रोजी ङाक दिवस, १० रोजी सेविंग बँक दिवस, ११ रोजी मेल दिवस, १२ रोजी डाक टिकीट संग्रह दिवस, १३ रोजी व्यापार दिवस, १४ रोजी विमा दिवस साजरा केला जातो. 

या बाबत अधिक माहिती देतांना अक्षय खाडेंनी सांगितले कि, १८५२ साली भारतात पहिले डाक तिकीट निर्माण करण्यात आले. तेव्हा त्याची किम्मत अर्धा आना म्हणजे ३ पैसे होती. त्या नंतर स्वतंत्र्य भारताचे पहिले डाक तिकीट २१ नोव्हेंबर १९४७ रोजी काढण्यात आले.

 त्या तिकिटावर भारताचा तिरंगा ध्वज व जय हिंद असे लिहिले होते. या तिकिटाची किम्मत ३½ आने होती. भारतात आता पर्यंत ३००० पेक्षा अधिक तिकिटांची निर्मिती करण्यात आली असून मोठे प्रख्यात कलावंत व बहुतांश मोठे राष्ट्रीय नेते यांचे तिकिटे काढण्यात आली आहेत. 

अलीकडच्या  काळात कोविड योद्धा, स्वच्छ भारत, रामायणा, केन्द्रीय रिझर्व्ह पोलिस दल, राष्ट्रीय एकता दिन, अयोध्या राम मंदिर, क्रिकेट पटू सचीन तेंडुलकर आदी काही विशेष तिकिटे काढण्यात आलेली आहेत. अक्षय खाङे यांच्या संग्रहात ही सर्वच तिकिटे उपलब्ध असून २००० पेक्षा जास्त भारतीय तिकिटांचा समावेश त्यांच्या संग्रहात आहे.

    Post Views:  257


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व