लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या प्रमुख पदांवर खामगाव शहराला मिळाला बहुमान
ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल, सागर मोदी आणि मो. फारुक सर यांची नियुक्ती
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2025, 1:12 PM
खामगाव:- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आता वटवृक्षाकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातून येणाऱ्या अनुभवी पत्रकारांच्या सहभागाने हे चित्र स्पष्ट होत आहे, असे महत्त्वपूर्ण वास्तव व विचार ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी खाडे यांनी व्यक्त केले. अकोला येथील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विचार मंथन मेळावा कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते तर लोकस्वातंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी संघटनेला मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून काही प्रमुख पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल यांना "जेष्ठ मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्य संघटन प्रमुख" पदावर; सागर मोदी यांची "विदर्भ संघटन प्रमुख" पदावर तर मोहम्मद फारुक सर यांची "बुलढाणा जिल्हा संघटन प्रमुख" पदावर नियुक्तीपत्रे देऊन नियुक्तीची घोषणा यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी केली आहे. बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी संभाजीराव टाले यांची नियुक्ती यापूर्वी झालेली आहे.
या नियुक्त्यांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरच बुलढाणा जिल्हा आणि खामगाव शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
Post Views: 100