रॅंक ऑरगॅनिक कारखान्यात कामगार गंभीर जखमी...
बोईसर | तारापूर औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस कारखान्यामध्ये अनेक दुर्घटना घडत असतानाच तारापूर औद्योगिक क्षेत्राचे भोपाळ मध्ये रूपांतर होणार तर नाही ना अशी चिंता कामगारांच्या मनात घर करून बसली आहे. असे असतानाच २९ नोव्हेंबर २०२४ पहाटे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रॅंक ऑरगॅनिक कारखान्यात तीन कामगार होरपळून जखमी झाले होते. पहाटे कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक उडालेल्या आगीच्या भडग्यात चंद्रकांत बापू घरत वय वर्षे ५१,दिपक करलेकर वय वर्ष ३९ व प्रविण तळपे वय वर्ष २८ हे तीन कामगार आगीत गंभीर होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने बोईसर येथील संजीवनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून तीघ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ भानुशाली यांनी सांगितले आहे.
रँक ऑरगॅनिक कारखान्यात दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पहाटे आगीच्या भडग्यात होरपळलेल्या कामागारांची प्रकृती आता स्थिर असून ५१ वर्षीय कामगार चंद्रकांत घरत हे १७ ते १८ % भाजलेले असून त्यांना उच्च डायबिटीस असल्यामुळे उपचारासाठी वेळ लागत असून ३१ वर्षीय कामगार दिपक करलेकर हे २० % आगीत भाजलेले असून यांना उपचारादरम्यान डायबिटीस असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच २८ वर्षीय कामगार प्रविण तळपे हा १९ % आगीत भाजलेला आहे. तर कामगार व उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग पालघर यांनी दिलेल्या वेगवेगळ्या माहितीनुसार नेमकी आग कशामुळे लागली यात शंका निर्माण होत असून कारखाना प्रशासनाने कुठलीच माहिती देण्याचे टाळल्यामुळे मोठी शंका उपस्थित केली जात आहे. तसेच कारखाना प्रशासन कामगारांच्या जीवीताशी खेळतअसून पुरेसी सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देत नसल्याचे देखील दिसून येत आहे.
प्रतिक्रया - आरोग्य विभाग
सेंटर फ्युज या यंत्रातून प्लॅस्टिक ड्रम मधे एस एस एफ नावाचा उत्पादन पावडर हाताळताना आग लागून कामगार जखमी झाल्याचे दिसून येत असून थंडीच्या दिवसात मानवी उर्जा तयार होऊन ज्वलनशील रसायनाला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील कार्यवाही सुरू आहे तपासाअंती योग्य ती कारवाई केली जाईल : अमोल बाईत - उपसंचालक औ. सुरक्षा व आरोग्य विभाग पालघर |
प्रतिक्रिया - जखमी कामगार
रात्रीपाळी सुरू असताना ५ हजार लिटर क्षमतेच्या वेसलमधे प्रक्रिया सुरू असताना मेनव्होल खोलून कच्चामाल टाकत असताना आगीचा बडगा तोंडावर आल्यामुळे डावा हात व तोंडावर भाजले आहे : चंद्रकांत बापू घरत - कामगार रॅंक ऑरगॅनिक
उत्पादन प्रक्रिया सुरू असताना दोन्ही हात व तोंडावर भाजले आहे. त्यामुळे आता डायबिटीस देखील झाली आहे पोलीसांनी जबाब घेतला आहे : दिपक करलेकर - कामगार रॅंक ऑरगॅनिक
उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक तोंडावर आगीचा बडगा उडाला दवाखान्यात आल्यावर समजले दोन्ही हात व तोंड भाजले आहे : प्रविण तळपे - कामगार रॅंक ऑरगॅनिक
Post Views: 35