मी मतदान करणारच या प्रतिज्ञाने संक्रांत साजरी करा - वैशाली बाहाकर
अकोला - यावर्षी संक्रांत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान सोबतच येण्याचा खूप चांगला योग आला आहे. संक्रांतीच्या सणात महिलावर्ग एकमेकींच्या घरी जाऊन तिळगुळासह विविध वस्तूंचे वाटप करतात. परंतु यावर्षीची संक्रांत तमाम महिला भगिनींनी उखाणे व वस्तू वाटप या पुरतीच मर्यादित न ठेवता मी मतदान करणारच या प्रतिज्ञाने साजरी करावी असे आवाहन अकोला जिल्हा पाटील समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली बाहाकर यांनी केले आहे. प्रत्येक निवडणुकीत 50 टक्के मतदान महिलांचे असते. परंतु मतदान आटोपल्यानंतर महिला व पुरुषांच्या झालेल्या मतदानाची टक्केवारी केवळ 45 ते 55 टक्क्यांच्या घरात असते. म्हणजे हजारो मतदार आपले मतदानाचे पवित्र व अतिशय महत्त्वाचे कार्य विसरून घरातच बसलेले असतात. ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ही टक्केवारी वाढविण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. आणि त्यांनी ही सुरुवात आपल्या घरातूनच करावयास हवी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के वाटा असणाऱ्या महिलांनी या संक्रांतीत " मी मतदान करणारच " आणि करून घेणारच ही प्रतिज्ञा करून तिचे प्रामाणिकपणे पालन करावे अशी विनंती वजा आवाहन वैशाली बाहाकर यांनी केले आहे.
Post Views: 51